नंदुरबार जिल्हा दुष्काळी घोषित करा - माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:45+5:302021-07-23T04:19:45+5:30

दरम्यान, चंद्रशेखर बावनमुळे यांच्या उपस्थितीत शहादा व नंदुरबार येथे विविध कार्यक्रम पार पडले. यात शहादा येथील बाजार समितीत ...

Declare Nandurbar District Drought - Former Minister Chandrasekhar Bavankule | नंदुरबार जिल्हा दुष्काळी घोषित करा - माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नंदुरबार जिल्हा दुष्काळी घोषित करा - माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दरम्यान, चंद्रशेखर बावनमुळे यांच्या उपस्थितीत शहादा व नंदुरबार येथे विविध कार्यक्रम पार पडले. यात शहादा येथील बाजार समितीत युवा मोर्चातर्फे युवा वॉरियर बैठक घेण्यात आली.

बैठकीत माजी मंत्री बावनकुळे यांनी, २५ लाख युवा वॉरियर्स भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून जोडण्याचे लक्ष्य आहे. १८ ते २५ वयोगटांतील युवकांना या अभियानात सहभागी करणार असून, डिजिटल व स्किल इंडियाच्या माध्यमातून त्यांना सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मानस भारतीय जनता पार्टीचा आहे. या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी शाखा फलकाचे अनावरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, सातपुडा सहकारी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्‍हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, युवा वॉरियर्स प्रदेश संयोजक अनुप मोरे, विभागीय संयोजक प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, योगेश मैंद, प्रदेश सचिव विजय बनछोडे, अनिकेत पाटील, हर्षल विभांडीक, प्रदेश सदस्य संकेत बावनकुळे, किरण बोराडे, अंकित संचेती, जयनागर खेडकर , अक्षय पाटील, स्वप्निक काळे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, प्रकाशा मंडळाचे अध्यक्ष ईश्वर पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, मयूर पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जितेंद्र जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनोद जैन यांनी आभार मानले.

Web Title: Declare Nandurbar District Drought - Former Minister Chandrasekhar Bavankule