शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा घरीच साजरा करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोणा या विषाणूजन्य साथरोगाचा प्रसार गर्दीतून होत असल्याने खबरदारी म्हणून यावर्षी १४ एप्रिल रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोणा या विषाणूजन्य साथरोगाचा प्रसार गर्दीतून होत असल्याने खबरदारी म्हणून यावर्षी १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सामूहिक कार्यक्रम न घेता व्यक्तिगत घरोघरी जयंती साजरी करण्याचा निर्णय शहाद्यातील आंबेडकरी अनुयायींनी घेतला आहे.सध्या संपूर्ण जगासह भारतातही कोरोणाचे संकट आले आहे. महाराष्ट्र राज्यातील जनताही या साथ रोगाशी झुंजत आहे. केंद्र व राज्य सरकारने कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. येत्या १४ एप्रिल पावतो संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनद्वारे गर्दी कमी करून कोरोणाची साखळी खंडित करणे हा हेतू आहे. यामागील एकमेव उद्देश सामूहिक गर्दी कमी करणे असा आहे.१४ एप्रिल म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस. यानिमित्त आंबेडकरी अनुयायी दरवर्षी विविध कार्यक्रमांसह मिरवणुकीचे आयोजन करतात. या वेळी अभिवादनासह मिरवणूक, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, भीमगीत, व्याख्यान आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते. यात मोठ्या संख्येने सारेच भीमअनुयायी एकत्र येतात. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करून कोरोणाच्या साखळीला खंडित करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवत १४ एप्रिलला आपापल्या घरी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती साजरा करण्याचे नियोजन आंबेडकरी जनतेने केले आहे. यादिवशी घरावर पंचशील किंवा झेंडा ऊभारून भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण करत बुद्ध , धम्म, भीम वंदन पठणासह वैयक्तिक ग्रंथ वाचनासारखे कार्यक्रम घेऊन कोरोणाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. आंबेडकरी अनुयायींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.