शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फलज्योतीषावर शहाद्यात रंगला वाद-संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : फलज्योतीष विज्ञान आहे का? या विषयावर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञानबोध वहिनी विभागाचे राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : फलज्योतीष विज्ञान आहे का? या विषयावर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञानबोध वहिनी विभागाचे राज्य कार्यवाहक प्रा.डॉ.नितीन शिंदे आणि बृहन महाराष्ट्र ज्योतीष मंडळ पुणेचे ज्योतीषरत्न नंदकिशोर जकातदार यांच्यात वाद-संवाद हा कार्यक्रम रंगला.कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगानचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्योतिषशास्त्र हा विज्ञानाचा पाया आहे असे सांगून ज्योतिषशास्त्र एका विशिष्ट वर्णात अडकल्याने त्याचा विकास होऊ शकला नाही. जिथे संवाद असतो तिथे शास्त्र असते, शास्त्र नियमावर आधारित असते तर विस्मृतीत येणारे ज्ञान म्हणजे विज्ञान. धर्म म्हणजे संस्कार म्हणूनच माणूस धर्माप्रमाणे जगतो. प्रारब्ध म्हणजे माणसाचे कर्म असते. ज्योतिष शास्त्रातील भोंदूगिरीवर त्यांनी नापसंती व्यक्त करून ही भोंदूगिरी थांबली पाहिजे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास न करता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते केवळ काही गोष्टींचा बाऊ करून उलट समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात, असा आरोपही त्यांनी केला. तर आपली भूमिका मांडताना डॉ.नितीन शिंदे यांनी पीपीटीद्वारे नक्षत्र, ग्रह, तारे, राशी यांचा मानवी जीवनावर काडीचाही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. राशी म्हणजे काय? पत्रिका म्हणजे काय? सामान्य माणसाला याचे काहीही ज्ञान नसते. परंतु तरीही लोक लग्न जुळवताना पत्रिका बघतात, राशिभविष्य बघतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. हजारो किलोमीटर लांब असलेले ग्रह माणसाच्या जीवनात काहीही करू शकत नाही. नक्षत्र, राशी या संकल्पना बरोबर असल्या तरी त्याचा संबंध माणसाची जोडणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.डॉ.के.बी. पाटील यांनी ज्योतिषशास्त्रातील कर्मकांड थांबवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. या वेळी बृहन महाराष्ट्र ज्योतिषी मंडळाच्या कार्याध्यक्षा मालती शर्मा, आनंद कुलकर्णी, नयना जकातदार, शैलेश देशपांडे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ.रवींद्र टोणगांवकर, डॉ.शशांक कुलकर्णी, डॉ.अलका कुलकर्णी, हैदरअली नुरानी, डॉ.विश्वास पाटील, सरकारसाहेब रावल, डॉ.सुभाष फुलंब्रीकर, डॉ.दर्शन कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अंनिसचे विनायक सावळे यांनी केले.