शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अफू पिकाची मोजणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST

रविवारी दुपारच्या सुमारास सुमारे साडेसात एकर परिसरात अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे ...

रविवारी दुपारच्या सुमारास सुमारे साडेसात एकर परिसरात अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व पथकाने धाड टाकून कारवाई सुरू केली. मंगळवारी सकाळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कापणी करण्यात आलेल्या पिकाच्या प्रत्यक्ष मोजमापास शासकीय पंचांसमोर सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रत्येकी २१ किलो वजनाचे २३५ पोत्यांचे असे सुमारे चार हजार ९३५ किलो अफू पिकाचे मोजमाप पूर्ण झाले असून बुधवारी दुपारपर्यंत कापणीसह संपूर्ण मोजमाप प्रक्रिया पार पाडली जाईल. ही कारवाई बुधवारी सुरू राहणार असून त्यानंतरच प्रत्यक्षात या साडेसात एकरातून किती किलो अफूचे उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे.

संपूर्ण रात्रभर या प्रकाराची चौकशी परिसरात पोलिसांतर्फे केली जात आहे. या अफूच्या शेतीचे मोजमाप करण्यात येऊन सुमारे १०० मजुरांच्या मदतीने अफूची कापणी सुरु आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत नेमका किती किलो अफू आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिली.

तीन दिवसांच्या पोलीस कारवाईनंतर एकूण चार हजार ९३५ किलो अफूचे उत्पादन मोजमापात निष्पन्न झाले आहे. यापेक्षा कितीतरी अधिक पट या सात एकर परिसरात अफूचे उत्पादन घेतले गेले असल्याने आजपर्यंत हा जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे अफू लागवडीचा उच्चांक ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पोलीस प्रशासनातर्फे केवळ संशयितांची चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत अधिकृतपणे कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नसून कोणालाही कायदेशीररित्या अटक करण्यात आलेली नसल्याने याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूचे उत्पादन सापडल्यानंतर पोलीस प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने कारवाई करून पारदर्शीपणे तपास करण्यासह यातील मुख्य संशयिताला व मास्टर माईंडला बेड्या ठोकण्याची गरज असून या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे उघड करणे गरजेचे आहे.