शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भावी नवरदेवांवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST

आपली लाडकी लेक चांगल्या घरात जावी असे वधू पित्याला वाटते. जावईबापू नोकरीला असावा, घरी शेती, बिल्डींग, चारचाकी असावी, आपल्या ...

आपली लाडकी लेक चांगल्या घरात जावी असे वधू पित्याला वाटते. जावईबापू नोकरीला असावा, घरी शेती, बिल्डींग, चारचाकी असावी, आपल्या मुलीला सुखी ठेवील असाच जावई मुलीचे वडील शोधीत आहेत. पण शंभरात एक जावई असा सापडतो तर इतर टुक्कार, दारुडे, संशयी वृत्तीचे, अहंकारी, इगो ठासून भरलेले, बापाच्या जीवावर जगणारे व नेत्याचा जयजयकार करीत फिरणारे आसल्याने वधू पित्यांना चिंता पडली आहे. भाचा चांगला असला तरी मामी मुलगी देऊ देत नसल्याने बऱ्याच नात्यांमध्ये विघ्नही येऊ लागले आहेत. अशा एक ना आनेक समस्या मुलीच्या वडिलांसमोर आहेत. मुलगी द्यायची म्हटल्यावर नवरदेव व्यसनी आहे का? या शोधात मुलीचे वडील अनेक चौकशा करतात. त्यातून जर निर्व्यसनी मिळाला तर त्याचा विचार होतो. जर पुन्हा समजले की व्यसन करतो तर नको म्हणून निरोप येतो.

हुंडा नको फक्त मुलगी द्या हो...

मानपानाचा विचार केला तर वर पित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सुईपासून सर्व संसारची मागणी केली जात असे. परंतु सद्यपरिस्थितीत फक्त मुलगी द्या हो... अशी विनवणी वर पित्याकडून वधू पित्याकडे होताना दिसते.

अनाथ मुलींचाही विचार करावा

वातावरण बदलत आहे त्यामुळे परिस्थितीशी जमवून घ्यायला हवे. मुलांचे लग्न जमवण्यासाठी किंवा सून म्हणून मुलगी आणण्यासाठी अनाथालयातील मुलीचा स्वीकार करावा, एका अनाथ मुलीचे भाग्य उजळावे. त्यातून समाधान मिळेल व समाजातही चांगला संदेश पोहोचेल.

वधू पित्यांनी मानसिकता बदलावी

वधू पित्याकडून नोकरदार मुलांची मागणी केली जाते. परंतु ही मानसिकता बदलायला हवी. शेतकरी, व्यावसायिक अशी मुले भरपूर आहेत. लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्या मुलास मुलगी दिली तर तो नोकरदारापेक्षा सुखात ठेवू शकतो. त्यामुळे आपल्या मुलीला नोकरदारच नवरा हवा ही मानसिकता बदलायला हवी. अर्धवट शिक्षण सोडून उद्योग व्यावसायाकडे वळालेले, शेतीत काम करणारे तरूण यांचे विवाह होण्यास विलंब लागतो. मग नात्यातील मुलगी शोधली जाते. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलगी फुकट करायला तयार झाले तरी जवळचे नातलगही मुलगी द्यायला तयार होत नाहीत. अशा कारणांमुळे अनेक गावात, प्रत्येक गावात गुटखे, पानमसाला, सुपारी, तंबाखू खावून, पिचकाऱ्या मारणारे हजारो तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.