शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखायचा, पण निधी कोठून आणणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

तळोदा : येथील नगरपालिकेस गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या उपाययोजना करण्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी मिळाला होता. परंतु, यंदा पालिकेस निधी ...

तळोदा : येथील नगरपालिकेस गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या उपाययोजना करण्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी मिळाला होता. परंतु, यंदा पालिकेस निधी मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे. पालिका आपल्याकडीलच निधी खर्च करीत असली तरी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

नंदुरबार, शहादानंतर तळोद्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तळोदा पालिकेमार्फत संपूर्ण शहरात औषध फवारणी केली जात आहे. गेल्यावर्षी कोरोना उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनाने तेथे पालिकेला सहा लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने तीनवेळा निधी दिला होता. साहजिकच यातून पालिकेलादेखील थोडीफार आर्थिक मदत झाली होती. परंतु, यावर्षी प्रशासनाकडून अजूनही निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत पालिका प्रशासनास विचारले असता, आतापर्यंत निधी आलेला नाही. मागणी केली आहे. लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक गेल्यावर्षीपेक्षा या मार्च महिन्यातच रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे साहजिकच गावात उपाययोजना करण्यासाठी निधीही लवकर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्यावर अजूनही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या पालिकेचा स्वतःचा दवाखाना नाही. तरी पालिकेला इतर आरोग्य सुविधांसाठी खर्च करावा लागत असतो.