शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात मोरांचा वावर वाढल्याने चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील पोलीस लाईन तसेच इतर भागात दररोज सकाळ आणि सायंकाळ मोरांचे आगमन होत आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील पोलीस लाईन तसेच इतर भागात दररोज सकाळ आणि सायंकाळ मोरांचे आगमन होत आहे़ पावसाची चाहूल लागल्यानंतर पिसारा फुलवत थुईथुई नाचणाऱ्या मोरांना पाहून नागरिकांमध्येही चैतन्य निर्माण होत आहे़ दररोजचे हे दृश्य पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत़शहरातील गल्लीबोळात अत्यंत निर्भिडपणे वावरुन नागरिकांचे लक्ष वेधणाºया मोरांना पाहून नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या जात आहेत़ पोलीस लाईन मागील भागातील परिसरात येणारे हे मोर शहरातील इतर भागातही विहार करत आहेत़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातून येणाºया या मोरांचा वावर प्रामुख्याने अन्न आणि पाण्याच्या शोधात सुरु झाला असावा असा अंदाज आहे़ अक्कलकुवा शहरालगतच्या शेतशिवारात छोटे मोठे कीटक आणि पाणी मुबलक प्रमाणात असल्याने मोरांचा येथे रहिवास वाढत आहे़ यातून मोर शहरी वसाहतींमध्येही दिसून येत आहे़ संख्या वाढणाºया या पक्ष्यांना कोणताही अपाय आजवर नागरिकांकडून करण्यात आलेला नाही़ याउलट नागरिक घराबाहेर येऊन मोरांचे पिसारा फुलवण्याचे मनोहारी दृश्य पाहून त्यात रमत आहेत़अक्कलकुवा शहरालगतची शेतशिवार तसेच गुजरात हद्दीतील गावांमध्ये मोठ्या संख्येने मोर आढळून येतात़ सातपुड्याच्या विविध भागातही मोरांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे़ मोठ्या संख्येने वाढीस लागणाºया या पक्ष्याची शिकार होण्याची शक्यता अधिक असल्याने वनविभागाने दक्षता घेण्याची अपेक्षा नागरिकांची आहे़