शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलचे सिटी स्कॅन मशीन पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐन कोरोनाच्या सर्वाधिक संक्रमनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना खाजगी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन कोरोनाच्या सर्वाधिक संक्रमनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडल्याने रुग्णांना खाजगी ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. या मशीनचा जो पार्ट निकामी झाला आहे तो विदेशातून मागवावा लागत असल्यामुळे समस्या निर्माण झाली असून आणखी किमान आठ दिवस हे मशीन बंदच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वीचे असलेले मशीन दुरूस्त करून ते पर्यायी स्वरूपात ठेवले असते तर आज सामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसला नसता असे बोलले जात आहे.कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी ही भरवशाची मानली जाते. परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह तर लक्षणे असलेल्यांची चाचणी निगेटिव्ह येत असल्याने गोंधळही उडत आहे. त्यामुळे कोरोनाला घातक असलेला न्युमोनियाचा संसर्ग छातीत किती प्रमाणात झाला आहे त्याचे निदान करण्यासाठी छातीचा सीटी स्कॅन करून त्यानंतर उपचाराची दिशा ठरविली जाण्याची पद्धत रुढ झाली आहे. परिणामी छातीचा सीटी स्कॅन करणे अत्यावश्यक मानले जात आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना देखील छातीचा सीटी स्कॅन करून घ्यावा लागत आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून येथील सीटी स्कॅन नादुरूस्त झाल्याने बंदच असल्याचे चित्र आहे.सुरुवातीपासूनच ‘नाट’सिव्हीलच्या सीटी स्कॅन सेंटरला सुरूवातीपासूनच नाट लागली आहे. आधी मशीन येत नव्हते. ते आले तर तंत्रज्ञ मिळत नव्हता. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच वर्ष हे मशीन धूळखात पडून होते. जेमतेत तंत्रज्ञ मिळाला तर तो देखील आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच येत होता. पुर्णवेळ तंत्रज्ञ मिळाला आणि मशीन खराब झाले ते आजतागायत दुरूस्त होऊ शकले नाही. त्यानंतर तातडीने दुसरे मशीन खरेदी करण्यात आले. ते गेल्या चार ते सहा महिन्यापासून सुरळीत सुरू होते. परंतु तीन दिवसांपूर्वी एक महत्वाचा पार्ट नादूरस्त झाला आणि मशीन बंद पडले.कोरोना संक्रमण ओळखण्यासाठी आवश्यककोरोनाचा किंवा न्युमोनियाचे छातीत किती प्रमाणात संक्रमण झाले आहे त्याचे निदान करण्यासाठी रुग्णाचा छातीचा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यात किती प्रमाणात संसर्ग आहे त्यावरून निदान व उपचार केले जातात. त्यामुळे कोरोना रुग्ण किंवा लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सीटी स्कॅन किती आणि कशा प्रमाणात अत्यावश्यक आहे याची जाणीव होते.आर्थिक भुर्दंडजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना खाजगी सीटी स्कॅन सेटरमध्ये जाऊन जास्त पैसे मोजावे लागत आहे. पूर्वी खाजगी सीटी स्कॅन सेंटरमध्ये पाच ते सहा हजार रुपये आकारले जात होते. आता शासन निर्णयानुसार अडीच ते तीन हजार रुपये आकारले जात आहे. काही ठिकाणी हा दर लागू झाला आहे तर काही ठिकाणी तो लागू करण्यात आलेला नाही. रुग्णांना सिव्हीलमधून खाजगी सेंटरमध्ये जावे लागत असल्याचेही चित्र आहे.एक्सरेवर निदानसद्या सिव्हीलच्या बहुतांश रुग्णांना सीटी स्कॅन ऐवजी एक्सरे आणि इतर तपासणीच्या आधारावर उपचार केले जात आहेत. आॅक्सिजन लेव्हल, रक्ताच्या चाचण्या, एक्सरे याद्वारे निदान करून उपचार केले जात असल्याचे दिसून येत आहे.तांत्रिक अडचणीमुळे सीटी स्कॅन बंद पडले आहे. संबधीत कंपनीच्या तंत्रज्ञाशी संपर्क साधण्यात आला असून निकामी झालेला पार्ट हा विदेशातून मागवावा लागणार आहे. त्यासाठी आणि किमान आठवडा लागणार आहे. यासाठी सातत्याने फोलोअप घेतला जात आहे.-डॉ.के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.