ख्रिस्ती समुदायाचे संडे चर्च स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:36 IST2020-03-21T11:36:47+5:302020-03-21T11:36:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ख्रिस्ती समुदायाकडून रविवारी होणारी नियमित प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ एसए ट्रस्टच्या ...

The Christian community's Sunday church postponed | ख्रिस्ती समुदायाचे संडे चर्च स्थगित

ख्रिस्ती समुदायाचे संडे चर्च स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ख्रिस्ती समुदायाकडून रविवारी होणारी नियमित प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ एसए ट्रस्टच्या चर्चेस मध्ये होणाऱ्या प्रार्थनेबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़
कोरोनाची भिती दिवसेंदिवस वाढत आहे़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेत सुवार्ता अलायन्स चर्चच्यावतीने रविवारी होणारी प्रार्थना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला़ दरम्यान रविवारी होणाºया रविवारी जनता कर्फ्यूमध्येही ख्रिस्ती बांधव सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ जिल्ह्यातील एसए ट्रस्टच्या ११ चर्चमध्ये रविवारी प्रार्थना होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़ प्रार्थनेवेळी होणारे प्रवचन व्हॉटसअ‍ॅपद्वारे समाजबांधवापर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती रेव्हरंड अनुप वळवी यांनी दिली आहे़
२९ मार्च रोजीही चर्च बंद राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे़

Web Title: The Christian community's Sunday church postponed