शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

सीएए व एनआरसीच्या विरोधात निघाले मूकमोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवत नंदुरबार आणि शहादा येथे विविध मुस्लिम संघटना व एमआयएमतर्फे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवत नंदुरबार आणि शहादा येथे विविध मुस्लिम संघटना व एमआयएमतर्फे मूकमोर्चा व आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते़ आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व शहादा येथे तहसीलदार यांना निवेदन देत कायदा रद्द करण्याची मागणी केली़नंदुरबारशहरातील इलाही चौकातून दुपारी अडीच वाजता एमआयएमतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ सीएए आणि प्रस्तावित एनआरसी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात युवकांसह आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता़ मूूकमोर्चा असल्याने फलकांद्वारे मोर्चाचा उद्देश स्पष्ट करण्यात येत होता़ मच्छीबाजार चौक, साक्री नाका, नवापुर चौफुली या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला़ याठिकाणी एमआयएमचे पदाधिकारी व नेत्यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले़ मोर्चासाठी शहरातील जळका बाजार, साक्री नाका, नवापुर चौफुली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात होता़ मोर्चासाठी नवापुर चौफुली तसेच साक्री नाका परिसरातून होणारी वाहतूक वळवण्यात आली होती़शहादाशहरातील खेतिया रोड परिसरात मोर्चाला सुरुवात होऊन चार रस्ता, गांधी पुतळामार्गे जुन्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संसदने नुकतेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारीत केले आहे. हे विधेयक भारतीय मुस्लीम समाजासाठी अहितकारक व त्रासदायक असून भारतीय घटनेच्या सर्वधर्म समभाव या मूळ संकल्पेनेच्या विरुद्ध असल्याने सदरचा कायदा त्वरित रद्द करावा. सर्वधर्मियांना घटनेने धर्माचे आचरण करुन एकमेकांचा आदर करुन गुण्यागोविंदाने राहण्याचा अधिकार दिला आहे. हा कायदा म्हणजे धार्मिक असमानता व दोन समाजात तेढ निर्माण करुन लोकशाही व राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. नागरिकांचे हित जोपासण्यासाठी सदर कायदा त्वरीत रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़