प्रकाशा येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:20 IST2019-10-15T12:20:42+5:302019-10-15T12:20:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच ...

The body of an unknown person was found at Prakash | प्रकाशा येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

प्रकाशा येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडली आह़े सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली़
प्रकाशा शिवारात खाजगी स्टोन क्रशरच्या परिसरात 40 ते 45 वय असलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आला होता़ कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची दरुगधी येत असल्याने परिसरात काम करणा:या मजूरांनी शोध घेतला असता मृतदेह असल्याचे समजून आल़े त्यांनी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रात माहिती दिल्यानंतर कारवाई करण्यात आली़ गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह दिसून आल्याने संबधित व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ वाढले आह़े किमान 1 महिन्यापूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आह़े मयत व्यक्ती याठिकाणी कधी आणि केव्हा आली असावी याचा पोलीसांकडून शोध घेण्यात येणार आह़े पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे, वंतू गावीत यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल़े शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े 
 

Web Title: The body of an unknown person was found at Prakash