म्हसावदला ८४ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:33+5:302021-07-05T04:19:33+5:30

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ...

Blood donation of 84 donors to Mhaswad | म्हसावदला ८४ दात्यांचे रक्तदान

म्हसावदला ८४ दात्यांचे रक्तदान

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ आणि आणि विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी म्हसावद, ता. शहादा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला श्री साईबाबा भक्त मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल हिरजी चौधरी, सचिव गणेश नरोत्तम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार, तर अनिल अशोक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी माधव शंकर पाटील, हिरालाल बाबू पाटील, भगवान उत्तम पाटील, शशिकांत पाटील, सुधाकर बुला पाटील, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सुनील बिराडे, मुख्याध्यापिका सुरेखा गुजर, आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ८४ दात्यांनी रक्तदान केले. व्हीसीजीजीएमचे महेंद्र पाटील (नाशिक), संदीप पाटील (शहादा), प्रवीण पाटील (सुजालपूर), हितेश पाटील (बामखेडा), रूपेश पाटील (लोणखेडा) यांनी मार्गदर्शन केले. चिखलीचे तुषार पाटील, लक्ष्मीकांत पाटील, महेश पाटील, म्हसावद व्हीएसजीजीएमचे विभाग प्रमुख योगेश पाटील, हितेश चौधरी, गणेश चौधरी, ललित पाटील, शुभम पाटील, रोहित पाटील, दीपक चौधरी, प्रज्वल पाटील, भगवान पाटील, दर्शन पटेल, आकाश पटेल यांनी परिश्रम घेतले. सती गोदावरी माता विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ. सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, विपीन पाटील, सागर पावरा, उद्धव चौधरी, चंद्रकांत दंडगव्हाण, ‘लोकमत’चे प्रतिनिधी सुधाकर पाटील, अंबालाल पाटील, राधेश्याम कुलथे यांनी सहकार्य केले.

Web Title: Blood donation of 84 donors to Mhaswad