वीज बील वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:28 IST2021-03-14T04:28:08+5:302021-03-14T04:28:08+5:30

नंदुरबार : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वीज कंपनीच्या अभियंत्यास लाकडी काठीने पती-पत्नीने मारहाण केल्याची घटना गुरुकुलनगर, नंदुरबार येथे ...

Beating an officer who went to collect electricity bill | वीज बील वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यास मारहाण

वीज बील वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यास मारहाण

नंदुरबार : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वीज कंपनीच्या अभियंत्यास लाकडी काठीने पती-पत्नीने मारहाण केल्याची घटना गुरुकुलनगर, नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर रंजन चव्हाण असे अभियंत्याचे नाव असून प्रवीण पितांबर थोरात व त्यांची पत्नी अशी संशयीतांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज कंपनीचे सद्या थकीत वीज बील वसुली मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत चव्हाण हे पथकासह गुरुकुलनगरातील प्रवीत थोरात यांच्या घरी गेले. त्यावेळी थोरात यांनी पथकाशी वाद घातला. रागाच्या भरात लाकडी काठीने चव्हाण यांना मारहाण केली. तसेच पथकाला शिविगाळ केली.

याबाबत रामेश्वर चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने प्रवीण थोरात व त्यांच्या पत्नीविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गणेश सूर्यवंशी करीत आहे. थोरात यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Beating an officer who went to collect electricity bill