शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बँका झाल्या मेहेरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले ...

नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले होते. शासनाने गेल्या वर्षात २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळून पीक कर्जही मिळाले होते.

महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण २५ हजार २२ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती गेल्या वर्षात मिळून त्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने फेडून टाकले होते. यातून या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज मिळणे सुलभ झाले होते. परिणामी यंदाही कर्जवाटपात वाढ हाेण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबतची बैठक अद्याप व्हायची आहे. या बैठकीत बँकांचे २०२१-२२ या वर्षातील पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवले जाणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत बैठक होऊन कर्जाचे उद्दिष्ट ठरणार आहे. यानंतर कर्जवाटपाला सुरुवात होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षाच्या कर्जाची परतफेड केली असेल त्यांना तातडीने कर्ज मिळेल.

- जयंत देशपांडे, व्यवस्थापक, लीड बँक, नंदुरबार

शासनाकडून कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याने पीक कर्ज वेळेवर मिळाले होते. यंदाही बँकांनी कर्ज वितरण एप्रिलपासून सुुरू करण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम लवकर सुरू होणार आहे.

- वकील पाटील, शेतकरी, शनिमांडळ

कर्जमुक्ती मिळाल्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या वर्षात पीक कर्जही वेळेवर मिळाले होते. त्याचा भरणा करून यंदा नव्याने कर्ज घेण्याचा मानस आहे.

- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी, शनिमांडळ

२०१६ ते २०२० या पाच वर्षांतील सर्वाधिक कर्जवाटप हे २०२० मध्ये झाले आहे. दरवर्षी उद्दिष्टाच्या ११ ते १२ टक्के पीक कर्जवाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांनी गेल्या वर्षात २७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज २५ हजार शेतकऱ्यांना केले होते.