शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्टीव्हीटीअभावी बँकांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा येथील बीएसएनएल कार्यालयाकडे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी मोबाईल ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा येथील बीएसएनएल कार्यालयाकडे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी मोबाईल टॉवर बंद झाल्याने इंटरनेट कनेक्टीव्हीटीअभावी येथील दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज   शुक्रवारी दिवसभर ठप्प झाल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. मात्र येथील बीएसएनएल कार्यालयाकडे एक लाख 38 हजार रुपयांचे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठय़ाअभावी मोबाईल टॉवर बंद झाल्याने मोबाईल व इंटरनेटचे ग्राहक वैतागले आहेत. कनेक्टीव्हीटीअभावी येथील स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दिवसभर कामकाज ठप्प झाल्याने परिसरातील 15 ते 20 गावातील ग्राहकांना दिवसभर ताटकळत रहावे लागले. बँकेचे व्यवहार होत नसल्याने ग्राहक व बँकांच्या कर्मचा:यांमध्येही दिवसभर वादविवाद झाले. कनेक्टीव्हीटी न मिळाल्याने         ग्राहकांना व्यवहार न करताच परतावे लागल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सध्या शेतक:यांना खते, किटकनाशके घेण्यासाठी पैशांची गरज आहे. मात्र दोन दिवसांपासून पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एटीएममध्येही पैसे उपलब्ध न झाल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.याबाबत वीज कंपनीच सहायक अभियंता आर.एन. पाटील यांनी सांगितले की, सहा महिन्यापासून वेळोवेळी सूचना देऊन बीएसएनएलने बिल भरले नाही. बिलाची रक्कम वाढल्याने शेवटी वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. धुळे येथील बीएसएनएलचे सरव्यवस्थापकांना दूरध्वनीवरून या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले की,  मलाही आजच कळाले असून ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन वीज बिलाची रक्कम भरुन सेवा सुरळीत करण्याची मागणी मोबाईल व इंटरनेटच्या त्रस्त ग्राहकांनी केली आहे.