शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडा परिसर व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यांना जोडणारा महत्वाचा रस्ता अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी खराब झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडा परिसर व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यांना जोडणारा महत्वाचा रस्ता अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी खराब झाला आहे. हा रस्ता अद्याप दुरुस्त झाला नाही, त्यामुळे परिवहन महामंडळाची बंद करण्यात आली असून दुर्गम भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.  त्यामुळे हा रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष लागून आहे.सातपुडय़ातील नागरिकांना जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काकरदा ता.धडगाव व डाब ता.अक्कलकुवा मार्गे दोन रस्ते होतेच परंतु ते त्यांच्यासाठी खर्चिक व वेळखाऊ ठरत होते. त्यावर उपाय म्हणून चांदसैलीमार्गे धडगाव ते तळोदा हा अत्यंत सोयीस्कर मार्ग काढण्यात आला. हा मार्ग सुखरुप प्रवासासाठी अवघडच, तरीही दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतुक सुरू करण्यात आली. त्यात प्रवासी वाहतुक करणा:या खाजगी वाहनांसह परिवहन महामंडळामार्फत देखील मिनी बसच्या माध्यमातून वाहतुक सेवेला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीतून रडत-खडत का असेना सेवा सुरू असतानाच यंदाच्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता ठिकठिकाणी तुटला. त्यात धडगावच्या बाजूने चांदसैली माता मंदिराजवळ व उखळीआंबा गावाजवळ नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे परिवहन महामंडळामार्फत चारही बसफे:या बंद करण्यात आल्या, परिणामी अवघ्या सातपुडय़ातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तुटलेला रस्ता तातडीने दुरुस्त करुन एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.