शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेल्टर होममध्ये १८९ स्थलांतरीतांना दिला आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने घराकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरीतांच्या सोयीसाठी जिल्ह्यात नऊ ठिकाणी शेल्टर होम उभारले आहेत़ यातील केवळ तीन ठिकाणी सध्या १८९ मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ या मजूरांना प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून मदत देत आहे़कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशभरातील वाहतूक सेवा बंद झाली आहे़ यातून उद्योगधंदे बंद पडल्याने गुजरात राज्याच्या विविध भागातून स्थलांतरीत कामगार पायी घराकडे निघाले होते़ खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि परराज्यातील मजूरांचा समावेश होता़ अन्नपाण्याविनाच निघालेल्या या स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ यानुसार जिल्ह्यातील ९ ठिकाणी छावण्या तयार करण्यात आल्या होत्या़ गेल्या आठवड्यात यातील केवळ दोन ठिकाणी ५७ मजूर होते़ परंतु गेल्या तीन दिवसात त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव येथील छावणीत सर्वाधिक स्थलांतरीतांना ठेवण्यात आले आहे़ दिवसेंदिवस पायी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असली तरी तहसीलदारांच्या अखत्यारित या छावण्यांचे कामकाज देऊन प्रत्येक ठिकाणी तीन ते चार महसूल कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे़ यात तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि तहसीलदार हे छावण्यांवर लक्ष ठेवून आहेत़ त्यांच्याकडून येथे वेळोवेळी भेटी देणे सुरु आहे़आरोग्य विभागामार्फत दर एक दिवसाआड आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक पथक पायी चालून आलेल्यांची तपासणी करत असून आरोग्य सेवकांकडून त्यांचे सर्वेक्षण करुन घेण्यावर भर देण्यात आला आहे़लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत पाठवण्यात येणार आहे़नंदुरबार शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक १ आणि ४, जिल्हा परिषदेची मध्यवर्ती शाळा, तळोदा शहरात प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील मुलींचे वसतीगृह, खापर ता़ अक्कलकुवा येथील आदिवासी मुलींचे वसतीगृह, नवापुर शहर, सुरवाणी ता़ धडगाव येथील आदिवासी मुलांचे वसतीगृह, म्हसावद आणि प्रकाशा ता़ शहादा येथील सद्गुरु धर्मशाळा येथे स्थलांतरीत मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे़ यात अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील वसतीगृहात सर्वाधिक ८९, प्रकाशा येथे ४७ तर म्हसावद येथे १० स्थलांतरीत थांबले आहेत़ जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग आणि आंतरजिल्हा मार्गांवरुन हे मजूर घराकडे जात असताना चेकपोस्टवर त्यांच्या तपासण्या करुन त्यांना प्रशासनाकडून छावण्यांमध्ये रवाना करण्यात आले आहे़ सध्या मुक्कामी असलेले सर्वच स्थलांतरीत हे परजिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे़खापर येथे संख्या वाढल्यानंतर स्थलांतरीतांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने नवोदय विद्यालयाचे एक वसतीगृह सज्ज ठेवले आहे़खापर येथे मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवणाची सोय करुन दिली आहे़ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील पाच ते सहा सेवाभावी संस्था मदतीला तयार आहेत़स्थलांतरीतांच्या मदतीसाठी सेवाभावी नागरिकही पुढे येत असून शहादा तालुक्यातील विविध नागरिकांनी एकत्र येत प्रकाशा आणि म्हसावद येथे मदत देणे सुरु केले आहे़तयार केलेल्या छावण्यांमध्ये मुबलक पाणी आणि वैद्यकीय सुविधा म्हणून आरोग्य पथकाच्या भेटी निश्चित करण्यात आल्या आहेत़ तसेच सकाळी चहा आणि नाश्त्याचीही सोय काही संस्थांनी करुन दिल्याचे सांगण्यात आले आहे़