मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:30+5:302021-06-10T04:21:30+5:30

वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने ...

Appeal to submit application for Honey Center Scheme | मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ, संस्था, व्यक्तींना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान १० वी पास असावा आणि वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे

मधमाश्यापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक, संस्थांना प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर एक एकर शेतजमीन किंवा प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा

भाडेतत्त्वावर घेतलेली एक हजार चौ.फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाश्यापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधितांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल. चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Appeal to submit application for Honey Center Scheme