२२ दिवसानंतर सुरु झाली बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:23 IST2020-04-14T12:22:01+5:302020-04-14T12:23:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले नंदुरबार बाजार समितीचे कामकाज तब्बल २२ दिवसानंतर सुरु झाले आहे़ ...

After 5 days the market committee started | २२ दिवसानंतर सुरु झाली बाजार समिती

२२ दिवसानंतर सुरु झाली बाजार समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले नंदुरबार बाजार समितीचे कामकाज तब्बल २२ दिवसानंतर सुरु झाले आहे़ यांतर्गत सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे ८०० क्विंटल धान्य आवक झाली असून कृषी विभागाकडून यादी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना येथे धान्य विक्रीसाठी बोलावले जात आहे़
लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बद असल्याने शेतीमाल काढणी करुन घरी बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत होते़ या पार्श्वभूमीवर शासनाने तालुकास्तरावर कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून नोंदणी करुन घेत बाजार समितीत मालाची विक्री करण्याचे शेतकºयांना कळवण्यात आले होते़ या पार्श्वभूमीवर नंदुरबार बाजार समितीत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करण्यात आलेल्या ७० शेतकºयांची नावे देण्यात आली होती़ या शेतकºयांनी गहू, ज्वारी आणि मका सोमवारी विक्रीसाठी आणले होते़ ३५ वाहनांमधून आणल्या गेलेल्या धान्याची व्यापाºयांनी सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे खरेदी केली़ यावेळी बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांच्यासह सचिव योगेश अमृतकर, कार्यालय अभियंता राजेंद्र गिरासे यांनी पाहणी केली़ दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करण्यावर भर देण्यात आला होता़ शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी केल्यानंतर तातडीने ती यादी कृषी विभागाकडे देण्यात येऊन धान्य माल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे़

दरम्यान नंदुरबार बाजार समितीत सर्वाधिक गहूची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ गव्हाला १ हजार ७०० ते १ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला आहे़ शेतकºयांकडून कृषी विभागाकडे नोंदण्या करण्याबाबत उत्सुकता दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे़ बुधवारी आणखी ७५ शेतकºयांच्या याद्या कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे़
नंदुरबार बाजार समितीचे कामकाज सोमवारी सुरु झाल्यानंतर शहादा बाजार समितीत मात्र शुकशुकाट होता़ गहूसह इतर धान्य खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजार समितीचे कामकाज बुधवारी सकाळी सुरु होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्याकडून देण्यात आली आहे़ कृषी विभागाकडून यादी मिळाल्यानंतर कामकाज सुरु होईल़

बाजार समितीचे कामकाज सुरु झाल्यानंतर येथे काम करणाºया हमाल मापाडींना दिलासा मिळाला आहे़ तब्बल २२ दिवस रोजगार नसल्याने हमालांचे हाल सुरु आहेत़ बाजार समितीत ३०० हमाल व मापाडी काम करतात़ प्रत्येक हमालास दिवसभरातून हंगाम सुरु असताना २५० रुपयांपर्यंत रोजगार मिळतो़ परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद झाल्यापासून त्यांना रोजगार मिळाला नव्हता़ सोमवारीही सर्व ३०० लोकांऐवजी मोजक्याच जणांना येथे बोलावण्यात आले होते़ यामुळे उर्वरित हमालांच्या रोजगाराची चिंता आहे़ बुधवारी पूर्ण क्षमतेने बाजार समिती सुरु झाल्यानंतर पुढील कामाची स्थिती स्पष्ट होणार आहे़

Web Title: After 5 days the market committee started