कोरोना केअर सेंटरमधील अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष- भाजपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:49+5:302021-03-25T04:28:49+5:30

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना निवेदन ...

Administration ignores problems in Corona Care Center- BJP | कोरोना केअर सेंटरमधील अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष- भाजपा

कोरोना केअर सेंटरमधील अडचणींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष- भाजपा

भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढला आहे ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात कोणाचा प्रभाव वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रति दिवस ३०० ते चारशे ६०० पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे. परंतु प्रशासकीय पातळीवर कुठल्याच हालचाली अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. जिल्ह्यात एकलव्य, तापी सारखे कॉरंटाईन सेंटर दुर्लक्षित आहे. कोरना पॉझिटिव्ह रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहे. सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय परत पाठविण्यात येत आहे असे या निवेदनात नमूद केले.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जि. प. सदस्य कपिल चौधरी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Administration ignores problems in Corona Care Center- BJP