सुमारे दोन हजार आशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:36 AM2020-06-04T11:36:01+5:302020-06-04T11:36:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसेवा बजावणाºया आशा सेविकांचाही ५० ...

About two thousand hopefuls will get insurance cover | सुमारे दोन हजार आशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

सुमारे दोन हजार आशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसेवा बजावणाºया आशा सेविकांचाही ५० लाख रुपयांचा विमा उतरवण्याचे शासनाने जाहिर केले आहे़ यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने १ हजार ९०० आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडे अर्ज भरुन घेण्यास सुरुवात केली आहे़
कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर काम करत आहेत़ यात जिल्हा आरोग्य विभागात काम करणारे आरोग्य कर्मचारी पुढे आहेत़ या आरोग्य सेवक आणि सेविकांच्या खांद्याला खांदा लावून ‘आशासेविका’ आणि गटप्रवर्तकही काम करत आहेत़ या आशांकडून क्वारंटाईन कक्षांसह ग्रामीण भागात आढळून येणाºया रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे सर्वेक्षण करुन त्यांना क्वारंटाईन करण्यापर्यंत सहकार्य करण्यात येत आहे़ या आशांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांच्याकडून गेल्या चार दिवसांपासून तालुकानिहाय विमा सुरक्षेचे अर्ज भरुन घेतले जात आहेत़ यासोबतच जिल्हा आरोग्य विभागात करणारे सुमारे ९०० कर्मचाºयांचेही अर्ज भरणे सुरु असून जिल्ह्यातून आशांसह किमान चार हजार आरोग्य कर्मचारी या विम्याचे अर्ज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित असलेले कंत्राटी कर्मचाºयांचेही अर्ज भरुन घेण्यात येत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे़
शासकीय कर्मचाºयांसोबत काम करणाºया आशा सेविका ह्या कोविड-१९ सोबत गर्भवती माता, सॅम-मॅम बालक तपासणीचेही काम नियमित करत आहेत़ ५० लाख रुपयांच्या विमा कवचामुळे त्यांच्या काम करण्याची उर्मी वाढणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांकडून सांगण्यात आले आहे़


जिल्ह्यात सध्या १ हजार ८७२ आशा काम करत आहेत़ सोबत १८० गटप्रवर्तक आहेत़ या सर्वांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कोरोना प्रतिबंधात्मक कामकाजात सहभागी करुन घेण्यात आले आहे़ खासकरुन ग्रामीण भागात कोरोना जनजागृतीत या महिला सेविकांचा सहभाग मोठा आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यात आशांची मदत घेतली जात आहे़ सर्व सेविकांना तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार त्यांच्याकडून टप्प्या टप्प्याने अर्ज देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़


आशा सेविकांसोबतच जिल्हा आरोग्य विभागात काम करणाऱ्या ८२५ कर्मचाऱ्यांचेही अर्ज भरुन घेतले जात आहेत़
आशांसोबतच १४१ आरोग्य सेवक, २७८ आरोग्य सेविका, ५१ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ६३ औषध निर्माता अधिकारी, ९६ आरोग्य सहायक, ४९ आरोग्य सहाय्यिका, ६ आरोग्य पर्यवेक्षक, १ कुष्ठरोग तंत्रज्ञ अशा एकूण ८९५ आरोग्य कर्मचाºयांचा विमा उतरवण्याची कारवाईही सुरु करण्यात आली आहे़ त्यांच्याकडून अर्ज भरुन घेतले जात आहेत़
जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट अ आणि गट ब अशा १५५ अधिकाºयांकडूनही विम्याचे अर्ज भरले जाणार आहेत़
वेग देण्यात आलेल्या या कामकाजामुळे आगामी काळात गरज पडल्यास एखाद्याच्या वारसांना योग्य पद्धतीने मदत देण्याची प्रक्रिया काही वेळेत पूर्ण होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे़
जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात काम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, सफाई कामगार, लिपिकवर्गीय कर्मचारी यांचेही अर्ज भरण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे़

Web Title: About two thousand hopefuls will get insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.