९०० मजूर सीमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:05 IST2020-04-28T13:05:07+5:302020-04-28T13:05:21+5:30

नंदुरबार : गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या ९०० मजूरांचा जत्था मंगळवारी सकाळी वाहनांनी सावळदा ता़ शहादा येथील गुजरात सीमेवर ...

900 laborers at the border | ९०० मजूर सीमेवर

९०० मजूर सीमेवर

नंदुरबार : गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या ९०० मजूरांचा जत्था मंगळवारी सकाळी वाहनांनी सावळदा ता़ शहादा येथील गुजरात सीमेवर दाखल झाले़ त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे स्क्रीनिंग करुन त्यांना क्वारंटाईन करणे सुरु झाले आहे़
जिल्ह्याच्या विविध भागातील मजूर यंदा गुजरात राज्यात मजूरीसाठी गेले होते़ शहादा तालुक्यातील ९०० मजूर सौराष्ट्र भागात कामासाठी गेले होते़ लॉकडाऊनमुळे त्यांना परतणे शक्य झाले नव्हते़ दरम्यान मंगळवारी सकाळी विविध वाहनांनी सुमारे ९०० मजूर गुजरात राज्यातील उच्छल मार्गाने निझर तालुक्यातील यावल येथील सीमेपर्यंत आले़ याठिकाणी नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही वाहने रोखून धरत तशी माहिती प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने येथे भेट देत माहिती घेतली़

सीमेवर दाखल झालेल्या मजूरांचे स्क्रीनिंग करुन मगच त्यांना जिल्ह्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले़ यानंतर या सर्व मजूरांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारुन गावीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे़

Web Title: 900 laborers at the border