शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे विना मास्क फिरणाऱ्यांकडून ८० हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST

प्रकाशा येथील बाजारपेठेत परिसरातील गावातील नागरिक बाजारासाठी येतात. या गर्दीत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी ...

प्रकाशा येथील बाजारपेठेत परिसरातील गावातील नागरिक बाजारासाठी येतात. या गर्दीत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून कारवाई करत आहेत. त्यात ४०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून सुमारे ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शहादा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशा येथील हवालदार सुनील पाडवी, रामा वळवी, विकास शिरसाठ, अजित नागलोद आदींनी ही कारवाई केली.

दरम्यान, प्रकाशा गाव एक महिन्यापासून कोरोनामुक्त होते. मात्र, २६ मे रोजी पुन्हा रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभागाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. गावात चौकाचौकांत बसणाऱ्यांना पोलिसांकडून समज देण्यात येत आहे. शनिवारी सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर गावातील काही तरुण क्रिकेट खेळत होते. क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी गर्दी जमली होती. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुण पळून गेल्यांच्या त्यांच्या आठ ते दहा मोटारसायकली जप्त केल्या होत्या. मोटारसायकली घेण्यासाठी हे तरुण आले असता त्यांना उठबशा घालण्याची शिक्षा देऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.