नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:48 IST2020-03-11T21:48:37+5:302020-03-11T21:48:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात आंदोलन करणा:या नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना ...

57 Narmada rescue workers granted bail | नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना जामीन

नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात आंदोलन करणा:या नर्मदा बचावच्या 57 कार्यकत्र्याना बुधवारी न्यायालयाने जामिन मंजूर केल़े रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली़  
शुक्रवारी जिल्हा दौ:यावर आलेले नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक डॉ़ अफरोज अहमद यांच्याविरोधात नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यानी आंदोलन करुन ‘गो बॅक’चा नारा दिला होता़ अनेक वर्षापासून एकाच पदावर असूनही न्याय मिळाला नसल्याचे सांगून कार्यकत्र्यानी सर्किट हाऊसवर धडक देत तीव्र निदर्शने केली होती़ यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होत़े आंदोलनानंतर नर्मदा बचावचे आंदोलनाचे कार्यकर्ते चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्या 55 जणांना अटक करण्यात आली होती़ अटकेनंतर बुधवारी त्यांच्या जमिनावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी करण्यात आली़ न्यायालयाने नर्मदा बचाव आंदोलन आणि शासन या दोघांची बाजू ऐकून घेत सर्व कार्यकत्र्याना तातडीने जामिन मंजूर केला़ रात्री आठ वाजता 55 जणांची नंदुरबार जिल्हा कारागृह तर दोघांची धुळे येथील कारागृहातून सुटका करण्यात आली़ 

Web Title: 57 Narmada rescue workers granted bail