राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:16+5:302021-02-23T04:48:16+5:30

याबाबत असे की, नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्या मंदिरात २२ ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्य पुरस्कार परीक्षा घेण्यात येत ...

42 students from the district enter the state award test camp | राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी प्रविष्ट

राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जिल्ह्यातील ४२ विद्यार्थी प्रविष्ट

याबाबत असे की, नंदुरबार येथील राजे शिवाजी विद्या मंदिरात २२ ते २२ फेब्रुवारी दरम्यान राज्य पुरस्कार परीक्षा घेण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शिबिर प्रमुख नाशिक येथील नवनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत पाटील, नरेंद्र गुरव, जिल्हा संघटन आयुक्त गाईड कविता वाघ, परीक्षक म्हणून संकेत माळी, नरेंद्र पाटील, हिरालाल पाटील, अशोक शिंदे, ज्ञानेश्वर सावंत हे काम पाहत आहेत.

साेमवारी दिवसभरात विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षेत प्रार्थना, झेंडागीत, नियम, वचन, गणवेश, स्काऊट चळवळीचा इतिहास, आदी घेण्यात आले. तर लेखी परीक्षा ८० गुणांची घेण्यात आली.

उर्वरित तीन दिवसांमध्ये प्रात्यक्षिकात गाठी, ध्वजारोहण, नकाशा वाचणे, नकाशा काढणे, संदेशन, मागाच्या खुणा, गाठी, बांधण्या, व्यायाम प्रकार, आदी घेण्यात येणार आहे. यासाठी नीलेश गावीत, जोसेफ गावीत, सुज्ञान वळवी यांचे ही सहकार्य लाभत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत ही परीक्षा होणार आहे. यात नंदुरबारचे ३५, नवापूरचे चार, प्रकाशा शाळेचे चार विध्यार्थी सहभागी आहेत. शिबिरात जेवण, नाश्ता, चहाची सोय करण्यात आली आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पाळत ही परीक्षा घेण्यात येत आहे.

Web Title: 42 students from the district enter the state award test camp