आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २३ शिक्षकांना अखेर नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:42+5:302021-03-25T04:28:42+5:30

नंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २३ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्यांची धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात नियुक्ती करण्यात ...

23 inter-district transferred teachers finally appointed | आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २३ शिक्षकांना अखेर नियुक्ती

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २३ शिक्षकांना अखेर नियुक्ती

नंदुरबार : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २३ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्यांची धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी वनमाला पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

ॲागस्ट ते डिसेंबर २०२० तसेच २०२१ मध्ये आंतरजिल्हा बदलीने २३ शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. असे शिक्षक गेल्या आठ महिन्यांपासून नियुक्तीअभावी होते. त्यामुळे त्यांचा संयम सुटत चालला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेत देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ही बाब लक्षात घेता अशा शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. त्यात धडगाव तालुक्यात १५, अक्कलकुवा तालुक्यात सात तर तळोदा तालुक्यात एका ठिकाणी अशा शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी वनमाला पवार व शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बदली होऊ आलेले शिक्षक हे बीड, रायगड, जळगाव, अहमदनगर, रत्नागिरी, नाशिक जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने आले आहेत. या शिक्षकांमध्ये महिला, अपंग, पती-पती एकत्रीकरणअंतर्गत शिक्षकांचा समावेश आहे.

Web Title: 23 inter-district transferred teachers finally appointed