जीएसटी थकवून १३ कोटीत फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 21:36 IST2020-03-17T21:36:27+5:302020-03-17T21:36:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बोगस कंपनी स्थापन करुन शासनाचा १३ कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याप्रकरणी धुळे येथील व्यापाऱ्यासह त्याच्या ...

2 crore fraud by GST exhaustion | जीएसटी थकवून १३ कोटीत फसवणूक

जीएसटी थकवून १३ कोटीत फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बोगस कंपनी स्थापन करुन शासनाचा १३ कोटी रुपयांचा जीएसटी थकवल्याप्रकरणी धुळे येथील व्यापाऱ्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नवापुर येथे तुमिमा टॅक्स ही कंपनी स्थापन करुन हा प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे़
मोहंमद आसिफ मोहंमद यासीन रा़ धुळे याच्यासह त्याच्या साथीदारांनी मिळून नवापुर शहरात तुमिमा टॅक्स ही कंपनी स्थापन केली होती़ जुलै २०१७ पासून स्थापन असलेल्या या कंपनीने बनावट कागदपत्रे देऊन जीएसटी क्रमांक प्राप्त केला होता़ परंतू प्रत्यक्ष वस्तूंचा पुरवठा किंवा खरेदी न करताच खोटी बिले सादर करणे सुरु होते़ याबाबत नंदुरबार येथील वस्तू व सेवाकर कार्यालयाचे राज्यकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती़ चौकशी अंती कंपनी पूर्णपणे बोगस असल्याचे उघडकीस आले होते़ यात मोहंमद आसिफ याच्यासह व्यापाºयांनी मिळून शासनाचे तब्बल १३ कोटी ६० लाख ८७ हजार ६८९ रुपये बुडवल्याचे स्पष्ट झाले होते़
याप्रकारानंतर राज्यकर अधिकारी वसंत वसावे यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित मोहंमद आसिफ मोहंमद यासीन याच्यासह व्यापाºयांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याच्या कलमांसह महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत हे करत आहेत़ या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जीएसटी थकवून शासनाची फसवणूक होण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे़ संशयित आरोपींची पोलीसांकडून मंगळवारी तातडीने चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती आहे़

Web Title: 2 crore fraud by GST exhaustion