तोरणमाळ रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 11 मजूर जखमी

By Admin | Updated: May 8, 2017 12:35 IST2017-05-08T12:35:35+5:302017-05-08T12:35:35+5:30

चालक फरार : म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावरील घटना

11 laborers injured due to overturning a tractor trolley on the Toranmal road | तोरणमाळ रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 11 मजूर जखमी

तोरणमाळ रस्त्यावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने 11 मजूर जखमी

 नंदुरबार,दि.8- तोरणमाळ ते म्हसावद रस्त्यावर भरधाव वेगातील ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 11 जण जखमी झाल़े याबाबत ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

लोपापाणी ता़ धडगाव येथील मजूरांना घेऊन एम एच 31 एन 2004 वरील चालक हा शनिवारी दुपारी भरधाव वेगात तोरणमाळकडे निघाला होता़ अत्यंत वेगात असलेल्या ट्रॅक्टरचा हूक तुटल्याने गावापासून एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर ट्रॉली उलटली़ यात प्रविण अंबरसिंग वळवी रा़ तलावडी, दशरथ जुम्मा पवार, जिभाऊ रावण सुकळे, दीपक जवान सुकळे, गोटू मोतू ठाकरे, रविंद्र उत्तम पवार, कपिल इसन पवार, रवींद्र तुकाराम पवार सर्व रा़ इस्लामपूरा ता़ शहादा, कालुसिंग वाटय़ा नाईक, लेहरसिंग गिज्या नाईक, बारसिंग करमसिंग नाईक सर्व रा़ लोपापाणी ता़ धडगाव हे गंभीररित्या जखमी झाल़े या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला़ 

Web Title: 11 laborers injured due to overturning a tractor trolley on the Toranmal road