शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; मध्यंतरानंतर शाळातून पडली होती बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:09 IST

 हे दोन्ही विद्यार्थी नायगाव (ध) येथील असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे़

ठळक मुद्देधर्माबाद तालुक्यातील घटनाशाळेच्या मध्यंतरानंतर गेले होते पोहायला

धर्माबाद (जि. नांदेड) : येथून दोन कि़ मी़ अंतरावर असलेल्या बाळापूर शिवारातील तलावात दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली़  हे दोन्ही विद्यार्थी नायगाव (ध) येथील असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे़ 

बाळापूर येथील गुरुकुल विद्यालयातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेले लखन सिद्धप्पा राचेवाड व साईचरण किशन आलूरोड हे दोघे सकाळी सव्वाअकरा वाजता शाळेची मधली सुटी झाल्यानंतर शिक्षकांची नजर चुकवून बाहेर पडले आणि तलावात पोहण्यासाठी गेले़ पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व तलावात प्रचंड गाळ साचलेला असल्याने चिखलात रुतून या दोघांचाही मृत्यू झाला़ 

लखन व साईचरण हे धर्माबाद येथील राष्ट्रमाता जिजाऊ मुलांच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होते़ घटनेची माहिती कळताच धर्माबाद ठाण्याचे पोनि. सोहन माछरे, पोऊनि. सनगले तसेच पोलीस जमादार स्वामी व इतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले़ मुलांचे मृतदेह पाहून दोन्ही विद्यार्थ्यांच्या आईवडील तसेच नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला़ या घटनेबाबत गुरुकुल विद्यालयाचे मुख्याध्यापक मनमोहन कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या मध्यंतरात नजर चुकवून हे विद्यार्थी शाळेबाहेर गेल्याचे सांगितले.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यातविद्यार्थ्यांच्या मृत्यूला शाळा जबाबदार असल्याचा आरोप करीत मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी रात्री ११ पर्यंत मृतदेह ताब्यात घेतले नव्हते. शाळेसाठी ४० हजार रुपये शुल्क भरतो.  त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे काम शाळेचे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतले.

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीDeathमृत्यू