शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करताना ईव्हीएमसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 20:05 IST

आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी युवकाविरोधात लोहा पोलिसात गुन्हा दाखल

- गोविंद कदमलोहा- तालुक्यातील बेरळी येथिल एका तरुणाने मतदान करतानाचा ईव्हीएम आणि व्हीव्ही- पॅटसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा फोटो शेअर करणे तरुणास महागात पडले आहे. प्रमोद होळगे असे या तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४७ टक्के मतदान झाले होते. अनेक मतदार उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी केंद्रावर दाखल झाले. एका केंद्रावर १०५ वर्षांच्या आजीने मतदान केले तर एका केंद्रावर नव वधू - वराने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. अनेकांनी मतदान करून आल्यानंतर सेल्फी काढत मतदान करण्याचे आवाहन केले.  मात्र, लोहा तालुक्यातील बेरळी येथील एका युवकाने केंद्रात मतदान करतानाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा फोटो व्हायरल केला. प्रमोद होळगे असे या युवकाचे नाव आहे. त्याने फेसबुकवर हा फोटो शेअर करत आचारसंहितेचा भंग केला. 

दरम्यान, ही बाब निदर्शनास येताच सहाय्यक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी होळगे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याच्या आदेश दिले. एफएसटी पथकातील आदर्श कांबळे यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलीस ठाण्यात आचार संहिताभंग व लोकप्रतिनिधी कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बगाडे हे पुढील तपास करत आहेत.

मतदान न करता कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम मशीनदुसरीकडे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. तद्नंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले.

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Crime Newsगुन्हेगारी