आ.बालाजी कल्याणकर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:17 IST2021-04-18T04:17:07+5:302021-04-18T04:17:07+5:30

नांदेड- मुखेड तालुक्यातील वर्ताळा तांडा येथून घराबाहेर लावलेला ट्रक लंपास झाल्याची घटना घडली आहे. वर्ताळा तांडा येथील परशुराम पवार ...

MLA Balaji Kalyankar Positive | आ.बालाजी कल्याणकर पॉझिटिव्ह

आ.बालाजी कल्याणकर पॉझिटिव्ह

नांदेड- मुखेड तालुक्यातील वर्ताळा तांडा येथून घराबाहेर लावलेला ट्रक लंपास झाल्याची घटना घडली आहे. वर्ताळा तांडा येथील परशुराम पवार यांनी मोकळ्या जागेत ट्रक उभा केला होता. हा ट्रक चोरट्यांनी पळवून नेला. याप्रकरणी नामदेव सीताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडण सोडविण्यास गेलेल्यास मारहाण

नांदेड- मावशीच्या घरासमोर सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाला मारहाण करण्यात आली. ही घटना शहरातील सिद्धार्थनगर येथे घडली. घरासमोर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी सुरेश गौतम जमदाडे हे गेले असता आरोपींनी तलवारीच्या मुठीने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सुरेश जमदाडे यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरची पूड टाकून कुऱ्हाडीने मारले

नांदेड- जमिनीच्या वादातून एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना माहूर तालुक्यतील साकुर येथे घडली आहे. धम्मचक्र कंधारे यांना या घटनेत रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आले असून आरोपींनी त्यांच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कंधारे यांच्या तक्रारीवरून माहूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: MLA Balaji Kalyankar Positive