शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये व्हॉटस्अपवर फिरली इंग्रजीची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 17:02 IST

ज्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला, त्याचा प्रश्नपत्रिका क्रमांकही त्यावर आला

ठळक मुद्देप्रश्नपत्रिकेवरून विद्यार्थ्याचा क्रमांक मिळालासंबंधित विद्यार्थ्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार

नांदेड : इयत्ता १२ वीच्या परीक्षेस मंगळवारी जिल्ह्यातील ८२ केंद्रावर प्रारंभ झाला़ मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार करताना १६ विद्यार्थी आढळून आले असून या सर्व विद्यार्थ्यांना निलंबित  करण्यात आले आहे़ दरम्यान ११ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळी ११़४५ च्या सुमारास व्हॉटस्अपवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नाची फोटोकॉपी फिरत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याबाबतची माहिती शिक्षण मंडळाकडे कळविण्यात आली असून मंडळाच्या निर्देशानुसार या प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे़ 

इयत्ता १२ वीच्या परीक्षेस जिल्ह्यातील ८२ केंद्रावर मंगळवारी प्रारंभ झाला़ ३८ हजार ७११ विद्यार्थी या परीक्षेस बसले असून परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १५७ परीक्षा केंद्रासाठी  १२७ बैठी पथके निर्माण करण्यात आली आहे़ मंगळवारी ३७ हजार ७९८ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला़ दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी व्हॉटस्अपवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची फोटोकॉपी फिरत असल्याचे निदर्शनास आले़  याबाबत शिक्षण विभागाने तातडीने शिक्षण मंडळाला ही बाब कळविली आहे़ सदर फोटोकॉपीवर ज्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला, त्याचा प्रश्नपत्रिका क्रमांकही असल्याचे या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे़ सदरील प्रश्नपत्रिका मुखेड तालुक्यातील उमरदरी परीक्षा केंद्रावरून वायरल झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़आरक़ुंडगीर यांनी सांगितले़

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपexamपरीक्षाStudentविद्यार्थीNandedनांदेड