शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर ...

उमरी तालुक्यातील सिंधी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्यामुळे पृथ्वीतलावर मानव जात नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने वनस्पतींचे संवर्धन हे अत्यंत आवश्यक झाले. कसल्याच खर्चाविना अमाप उत्पादन देणारा बांबू लागवडीचा उत्तम पर्याय असून वातावरणातील ३० टक्के कार्बन घेऊन ३२० किलो ऑक्सिजन बांबू बाहेर सोडते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय पुढे येत आहे. अत्यल्प लागवड खर्च व कमी पावसात अवघ्या तीन वर्षांत तब्बल ६० फूट वाढ होणाऱ्या या बांबूची एका एकरमध्ये २२० झाडे तयार होतात. बांबूपासून इंधनाचा पर्याय असलेले इथेनॉल त्यापासून डिझेल, पेट्रोल, सीएनजी, कागद, कापड, फर्निचर आदी अनेक वस्तूंची निर्मिती होते. आता प्लास्टिक बंद होणार असल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे . लागवडीसाठी कसलाच खर्च नसलेले बांबू हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर व अधिक पैसा मिळवून देणारे उत्पादन ठरणार आहे. बांबू लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी पाशा पटेल यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पाटील सिंधीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे, शिरीषराव देशमुख गोरठेकर, पांडुरंग देशमुख गोरठेकर, सुभाष पाटील कोळगावकर, प्रल्हाद पाटील ढगे, रावसाहेब शिंदे, मल्लिकार्जुन चंदापुरे, साहेबराव शिंदे, सतीश देशमुख तळेगावकर आदींसह परिसरातील असंख्य शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.