Corona In Nanded: Stay home, stay safe; Appeal of administration in Mudkhed through temple courtyards | Corona In Nanded : घरात रहा, सुरक्षित रहा; मुदखेडमध्ये प्रशासनाचे मंदिराच्या भोंग्यांद्वारे आवाहन

Corona In Nanded : घरात रहा, सुरक्षित रहा; मुदखेडमध्ये प्रशासनाचे मंदिराच्या भोंग्यांद्वारे आवाहन

मुदखेड:तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी  रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे प्रशासनाने मंदिरातील लाउडस्पीकरद्वारे गावकऱ्यांचे प्रबोधन केले. यावेळी आपण,आपल्या घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले आहे.

दि.२५ बुधवार रोजी दुपारी १ वाजे दरम्यान उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी रोहीपिंपळगाव, गोपाळवाडी येथे भेट देऊन नागरिकांचे प्रबोधन केले. नागरिकांनी घरातच रहावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नका, बाहेर गावातील नागरिक गावात आल्यास प्रशासनाला माहिती द्या असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दिनेश झांपले,मुदखेड ठाण्याचे सपोनि विश्वांभर पल्लेवाड,माजी जि.प.सदस्य गणेशराव शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Corona In Nanded: Stay home, stay safe; Appeal of administration in Mudkhed through temple courtyards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.