शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज

By admin | Updated: July 21, 2014 00:56 IST

सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे.

नागपूर : सध्या देशात बरीच उलथापालथ सुरू आहे. वैचारिक आंदोलन पेटले आहे. परंतु या आंदोलनाबाबत सध्याचा तरुण अनभिज्ञ आहे. देशातील सर्व समस्यांचे समाधान हे आंबेडकरवादामध्ये आहे. त्यामुळे आजच्या तरुणांना आंबेडकरवाद सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत आणि भीम पत्रिका जालंधर (पंजाब)चे संपादक एल.आर. बाली यांनी केले. बाली यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी मंगल मंडप सभागृह कडबी चौक येथे नागपूरकरांतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समता सैनिक हरीश चहांदे होते. प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे,ज्येष्ठ विचारवंत प्रा. रणजित मेश्राम, डॉ. कृष्णा कांबळे प्रमुख अतिथी होते. याप्रसंगी एल.आर. बाली यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ‘आंबेडकरी आंदोलन के समतारत्न एल.आर. बाली’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावेळी बाली यांचा सत्कार केला. गेल्या कित्येक वर्षानंतर नागपूरकरांशी संवाद साधताना बाली म्हणाले, नागपूर हे देशातील सर्व आंदोलनाचे केंद्र आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मप्रवर्तनासाठी नागपूर शहराची निवड केली होती. सध्या देशात उलथापालथ होत आहे. वैचारिक आंदोलन सुरू आहे. आंबेडकरी म्हणणे आणि आंबेडकरी होणे यात मोठी तफावत आहे, नैतिक असणे, तर्कशील असणे आणि मेहनती असणे खऱ्या बुद्धिवंतांचे लक्षण आहे, असे सांगत येत्या काळात देशात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. ती एक लढाई राहणार असून त्यासाठी आंबेडकरवाद्यांनी तयार राहण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. भाऊ लोखंडे यांनी संविधान टोपलीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. समाज एकजूट राहिला तर कुणीही वाईट नजर टाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. रणजित मेश्राम यांनी बाली यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. कृष्णा कांबळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत समता सैनिक दल मजबूत होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. सचिन कांबळे यांनी संचालन केले. प्रवीण मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)