तरुणास मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:37+5:302020-11-29T04:06:37+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : चार अनाेळखी तरुणांनी ट्रक अडवला आणि ट्रकमधील दाेघांना मारहाण करून त्यांच्याकडून राेख रकमेसह इतर ...

The young man was beaten and robbed | तरुणास मारहाण करून लुटले

तरुणास मारहाण करून लुटले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : चार अनाेळखी तरुणांनी ट्रक अडवला आणि ट्रकमधील दाेघांना मारहाण करून त्यांच्याकडून राेख रकमेसह इतर साहित्य असा एकूण २२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर बायपास राेडवर शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री घडली.

सचिन नत्थूजी गजभिये (३३, रा. नारी राेड, नागपूर) व पुष्कर राजपूत या दाेघांनी येरला (ता. कळमेश्वर) शिवारातील पाेल्ट्री फार्मवरून काेंबड्यांचे खाद्य ट्रकमध्ये भरले आणि त्यांचे वजन करण्यासाठी कळमेश्वर एमआयडीसी परिसरातील धरमकाट्यावर आले. वजन केल्यानंतर ते याच ट्रकने येरला येथे जाण्यास निघाले. दरम्यान, कळमेश्वर बायपास राेडवरील गतिराेधकाजवळ ट्रकचा वेग कमी हाेताच मागून माेटरसायकलने आलेल्या चाैघांनी ट्रक अडवला. त्यांनी सचिन व पुष्करला ट्रकच्या केबिनमधून खेचत जबार मारहाण केली. यात दाेघेही जखमी झाले. त्या चाैघांनी सचिनकडील ७,८०० रुपये राेख, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पुष्करकडील पाच हजार रुपये राेख व १० हजार रुपयांचा माेबाईल असा एकूण२२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेत पळ काढला. चाैघेही २२ ते २५ वर्षे वयाेगटातील असल्याचे सचिनने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक खडसे करीत आहेत.

Web Title: The young man was beaten and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.