शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्थूलता दिवस; लठ्ठ व्यक्तींना ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 07:00 IST

लठ्ठपणा हा एक आजार आहे, आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्यभारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून लठ्ठव्यक्तींना या कक्षाचा मोठा आधार होत आहे.

ठळक मुद्देमेडिकलचा पुढाकार : मध्यभारतातील पहिला प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतात समृद्धी वाढत असतानाच लठ्ठ लोकांचे प्रमाणही वाढत असून ते हाताबाहेर चाललेले आहे. लठ्ठ होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्यामध्ये शरीराला हालचाली नसणे, बैठी कामे, अधिक उष्मांकाचा आहार यांचा समावेश होतोच, पण आनुवंशिकता आणि शरीराच्या चयापचय क्रि यांतील असमतोल हेही कारणे असतात. लठ्ठपणा हा एक आजार आहे, आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्यभारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून लठ्ठव्यक्तींना या कक्षाचा मोठा आधार होत आहे.लठ्ठपणा म्हणजे शारीरिक बेढबपणा नाही, तर तो एक रोग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केले आहे. लठ्ठपणामुळे वाढते आजार लक्षात घेऊन लठ्ठपणामुक्त महाराष्ट्रासाठी ‘डेडिकेटेड ओबेसीटी’कक्ष सुरू करण्याची घोषणा तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली होती. याची सुरुवात नागपूरच्या मेडिकलमधून करण्यात आली. औषधवैद्यकशास्त्र विभागात हा स्वतंत्र कक्ष असून आठवड्याला दहावर रुग्ण उपचारासाठी येत आहे. विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यानी सांगितले, या कक्षात लठ्ठ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार केले जातात. सोबतच योग्य जीवनशैली आत्मसात करण्याचे समुपदेनही केले जाते. ज्या रुग्णांचे वजन जीवनशैलीत बदल व उपचार करूनही कमी होत नाही त्यांना बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात आहे. ही शस्त्रक्रिया मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात केली जाते.

पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’भारतात जंक फूड, अल्कोहोल व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री ‘ओव्हरवेट’ किंवा ‘ओबेसिटी’ग्रस्त आहे. भारत हा ‘ओबेसिटी’ या लठ्ठपणाशी संबंधित आजारात जगात तिसऱ्या क्रमांकांचा देश आहे. ‘ओबेसिटी’ हा एक आजार आहे, हे लोकांना माहितीच नाही. वजन जास्त असल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, अ‍ॅथरोस्केरासिस असे आजार होऊ शकतात.लठ्ठपणा हा एक आजारलठ्ठपणातून येणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्यांना बहुसंख्य लोक तोंड देत आहेत. लठ्ठपणा हा एक आजार आहे. तो होण्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. त्याच कारणांवर ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्षात उपचार केले जातात. यासाठी स्वतंत्र कक्ष रुग्णांच्या सेवेत आहे.-डॉ. राजेश गोसावीप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

 

टॅग्स :Healthआरोग्य