महिलांनो पुढे या, मतदार यादीत नाव नोंदवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:48+5:302021-03-09T04:10:48+5:30

जागतिक महिला दिन नागपूर : आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परंतु सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत ...

Women come forward, register in the electoral roll () | महिलांनो पुढे या, मतदार यादीत नाव नोंदवा ()

महिलांनो पुढे या, मतदार यादीत नाव नोंदवा ()

जागतिक महिला दिन

नागपूर : आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परंतु सार्वत्रिक निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. त्यासाठी महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक असल्यामुळे महिलांनी पुढे येऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.

जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी हेमा बढे, विजया बनकर, सुजाता गंधे, ज्येष्ठ पत्रकार गीता तिवारी, निवडणूक प्रक्रियेच्या नागपुरातील ॲम्बेसिडर ज्योती आमगे, तहसीलदार राहुल सारंग तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला मतदान केंद्रप्रमुखांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

-------

Web Title: Women come forward, register in the electoral roll ()