बावनकुळेंचा वारसदार कोण असेल? पोतदार, कुकरेजा की तिसराच !

By कमलेश वानखेडे | Updated: May 19, 2026 14:00 IST2026-05-19T13:32:49+5:302026-05-19T14:00:48+5:30

Nagpur : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक सोमवारी जाहीर झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत कामठी मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर या जागेचा राजीनामा दिला होता.

Who will be the heir to the Bawankula family? Potdar, Kukreja, or someone else? | बावनकुळेंचा वारसदार कोण असेल? पोतदार, कुकरेजा की तिसराच !

Who will be the heir to the Bawankula family? Potdar, Kukreja, or someone else?

कमलेश वानखेडे
नागपूर:
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक सोमवारी जाहीर झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत कामठी मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर या जागेचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे, भाजपचे पारडे एकतर्फी झुकलेले असून, ज्याला उमेदवारी मिळेल तो आमदार होईल, असे चित्र आहे. भाजपकडून प्रदेश प्रतिनिधी डॉ. राजीव पोतदार, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर अनिल सोले, दयाशंकर तिवारी, संघनात्मक प्रमुख किशोर रेवतकर यांची नावे चर्चेत आहेत; पण राज्यसभा व विधान परिषदेसारखे धक्कातंत्र वापरत भाजपकडून तिसरेच कोणते नाव समोर केले जाईल का, याची उत्सुकता आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत डॉ. राजीत पोतदार, वीरेंद्र कुकरेजा, दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे नावे आघाडीवर होते. निष्ठावंत डॉ. पोतदार यांच्यासाठी तर जिल्हा भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. पोतदार यांच्यावर शिक्कामोर्तब होईल, असे वाटत असताना ऐनवेळी धक्कातंत्र वापरत प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना आमदारकी बहाल करण्यात आली.

भाजपने राज्यसभेवरही माजी महापौर मायाताई इवनाते यांची वर्णी लावत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. भाजपचे नागपूर जिल्हा संघटनात्मक संपर्कप्रमुख किशोर रेवतकर यांनी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या २८ वर्षाच्या सेवेची दखल घेत 'स्थानिक' मध्ये संधी देण्याची विनंती केली आहे. अनिल सोले 'पदवीधर'चे सीटिंग आमदार असताना तिकीट कापण्यात आले. त्यामुळे त्यांना संधी मिळावी, असा समर्थकांचा सूर आहे.

दयाशंकर तिवारी यांच्या रूपात हिंदी भाषिकांना न्याय मिळावा यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढविला जात आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे खासमखास मानले जाणारे कुकरेजा यांनी यापुढे आपण नगरसेवकाची निवडणूक लढणार नाही, असे आधीच जाहीर केले असून, ते 'पॉलिटिकल प्रमोशन'च्या प्रतीक्षेत आहेत.

पडद्यामागील इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे १ जून रोजी उमेद्वारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, अशी कुजबुज भाजप नेत्यांमध्ये आहे.

काँग्रेसकडून मुळक, कन्हेरे, पांडव यांची नावे चर्चेत

काँग्रेसचे १७० सदस्य आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सदस्य असून शेकापचे ११ सदस्य आहेत. संख्याबळाच्या अभावी काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. मोठ्या नेत्यांपैकी कुणी स्वतःहून लढण्यास इच्छुक नाही; पण पक्षाने आदेश दिला तर लढावे लागेल, अशी त्यांची भूमिका आहे. काँग्रेसकडून या निवडणुकीचा अनुभव असलेले माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष गिरीश पांडव व किशोर कन्हेरे यांची नावे चर्चेत आहेत. प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारीबाबत विचारणा झाल्यास इच्छुक उमेदवारांची नावे पाठविली जातील. प्रदेश काँग्रेसकडून ज्या नावावर शिक्कामोर्तब होईल त्या उमेदवाराच्या मागे काँग्रेसचे सर्व मतदार एकसंघपणे उभे राहून भाजपला टक्कर देतील, असे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.

भाजपचे ५२० मतदार

या मतदारसंघात एकूण ८९६ मतदार आहेत. यापैकी निवडणुका न झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे ५७ व पंचायत समित्यांचे १३ सभापती यांची पदे रिक्त आहेत. प्रत्यक्षात ८२६ म्हणजेच मतदार संख्येच्या २२ टक्के मतदार अस्तित्वात आहेत. नुकतेच नागपूर महापालिकेसह नगर परिषदांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर विजयी झालेले तब्बल ५२० मतदार आहेत. त्यामुळे भाजपचे एकट्याचे संख्याबळ हे उपलब्ध मतदारसंख्येच्या ६३ टक्के आहे. याशिवाय शिंदेसेनेचे ३०, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ९ सदस्य आहेत. अशा प्रकारे महायुतीचे संख्याबळ ५५९ म्हणजेच ६७.६७ टक्क्यांवर जाते.

१९ महिन्यांचा कार्यकाळ

या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या आमदाराचा कार्यकाळ १ जानेवारी २०१८ पर्यंत राहणार आहे. सुमारे १९ महिनेच आमदारकीचे समाधान लाभेल.

असे आहे पक्षीय बलाबल

मतदार - ८९६
भाजप - ५२०
शिंदेसेना - ३०
राष्ट्रवादी (अजित पवार) - ९
महायुती एकूण - ५५९
काँग्रेस - १७०
राष्ट्रवादी (शरद पवार) - १९
उद्धवसेना - ११
महाविकास आघाडी एकूण - २००
इतर - ६७


 

Web Title : नागपुर एमएलसी उपचुनाव: बावनकुले का उत्तराधिकारी कौन होगा?

Web Summary : बावनकुले की सीट खाली होने के साथ, भाजपा नागपुर एमएलसी उपचुनाव में हावी है। पोतदार, कुकरेजा और अन्य दावेदार हैं, लेकिन भाजपा चौंका सकती है। कांग्रेस मुलक, कन्हेरे और पांडव पर विचार कर रही है। भाजपा की ताकत उसे कम अवधि के चुनाव में बढ़त दिलाती है।

Web Title : Nagpur MLC by-election: Who will be Bavankule's successor?

Web Summary : With Bavankule's seat vacant, BJP dominates Nagpur MLC by-election. Potdar, Kukreja, and others are contenders, but BJP might surprise. Congress considers Mulak, Kanhere, and Pandav. BJP's strength gives them an edge in the election with a short term.

टॅग्स :nagpurनागपूर