शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आकड्यांमध्ये आम्ही कुठे? विदर्भात ओबीसींचा सवाल !

By राजेश शेगोकार | Updated: May 18, 2026 15:43 IST

Nagpur : विदर्भातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावर तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर ओबीसी समाजातील अस्वस्थता वाढलेली असतानाच, जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे.

राजेश शेगोकार
नागपूर :
विदर्भातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावर तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर ओबीसी समाजातील अस्वस्थता वाढलेली असतानाच, जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे. कुठे आंदोलनाची तयारी, कुठे बहिष्काराची भाषा, तर कुठे शांत पण खोल नाराजी... जर आमची मोजणीच नाही, तर आमच्या हक्कांचा हिशेब कोण मांडणार? आकड्यांमध्ये आम्ही कुठे, असा थेट सवाल ओबीसींमधून उमटत आहे. परिणामी, हा विषय केवळ सांख्यिकी नाही, तर थेट राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायाशी जोडला गेला आहे.

ओबीसी संघटनांचा मुख्य आक्षेप असा आहे की, जेव्हा समाजाची अधिकृत संख्या स्वतंत्रपणे नोंदवली जात नाही, तेव्हा त्यावर आधारित धोरणे कशी ठरवली जातील? आरक्षण, शैक्षणिक संधी, नोकऱ्या आणि राजकीय प्रतिनिधित्व यासाठी लोकसंख्येचा ठोस डाटा हा पाया मानला जातो. मात्र, जनगणनेत ओबीसी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींची खरी ताकद लपली जाईल या भावनांमधून असंतोष वाढत आहे.

विदर्भात काही ठिकाणी असंतोष थेट आंदोलनात रूपांतरित होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील काही गावांनी जनगणनेवर बहिष्कार टाकल्याची घटना असो की चंद्रपुरात ओबीसींनी वाजवलेल्या थाळ्या असो, या असंतोषाची तीव्रता दर्शवतात. नागपूरसह विदर्भात ओबीसी संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली असून, 'स्वतंत्र रकाना नाही तर जनगणनेत सहभागी होणार नाही', अशी भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी असहकार आंदोलनाचीही भाषा वापरली जात आहे. दरम्यान काही संघटनांवर सरकारधार्जिणी भूमिका घेतल्याचा आरोपही होत आहे.

आंदोलनाच्या तीव्रतेत अपेक्षित आक्रमकता नसल्याने, काही संघटनांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे, काही नेते सरकारसोबत संवाद ठेवून असल्यामुळे ओबीसी चळवळीमध्येच अंतर्गत मतभेद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. विदर्भात पारंपरिकरीत्या ओबीसी समाजाचा प्रभाव मोठा मानला जातो. कुणबी, तेली, माळी, बंजारा, कोळी, धनगर अशा समाजघटकांचा निवडणुकांमध्ये निर्णायक प्रभाव राहिला आहे.

दुसरीकडे, मराठा समाजाचेही प्रभावी अस्तित्व आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा केवळ सामाजिक न राहता तो थेट राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरला होता. तेवढा दबावगट ओबीसी संघटनांना विदर्भात निर्माण करता आला नाही हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. शेवटी, हा प्रश्न केवळ एका रकान्याचा नाही, तर सामाजिक न्याय, प्रतिनिधित्व आणि विश्वासाचा आहे. सरकार, संघटना आणि समाज यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी पारदर्शक संवाद आणि ठोस धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत, तर हा असंतोष पुढील काळात अधिक व्यापक आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरू शकतो.

अलीकडच्या काळात विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे आणि या यशामागे ओबीसींचा मोठा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे विदर्भातील आपला पारंपरिक ओबीसी मतदार टिकवून ठेवणे. दुसरीकडे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षही याच सामाजिक असंतोषातून राजकीय संधी शोधताना दिसत आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यात जातगणना होईल व ओवीर्सीची स्वतंत्र नोंद होईल हे आश्वासन सरकारने दिले असले, तरी सगळेच वातावरण संशयाचे असल्याने असंतोषाची धग कायम आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha OBCs Question: Where are we in the Numbers?

Web Summary : OBC communities in Vidarbha are agitated over the lack of a separate category in census, fearing loss of rights and political representation. Protests and boycotts are occurring, reflecting deep dissatisfaction. The issue poses a challenge for BJP and opportunity for opposition.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षणnagpurनागपूरVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र