मोदींची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा

By Admin | Updated: May 13, 2014 00:22 IST2014-05-13T00:22:52+5:302014-05-13T00:22:52+5:30

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली.

When Modi came to power, the expression on freedom of speech | मोदींची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा

मोदींची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित मीट द प्रेस कार्यक्र मात त्या बोलत होत्या.

मोदी हे कॉर्पोरेट क्षेत्राचे उमेदवार असल्याने ते त्यांचाच कार्यक्रम राबवतील. काँग्रेस व भाजप यासारख्या मोठय़ा पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्रातून निधी मिळत आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेत आल्यास ते भांडवलदारांच्या इशार्‍यावर चालतील, अशी शंका रॉय यांनी व्यक्त केली. केंद्रात मजबूत सरकार सत्तेत आले तर ते एककल्ली वागेल. मजबूत सरकार आले तर लोकांना समस्या मांडता येतील, त्यांना न्याय मिळेल. सामाजिक आंदोलनातील कार्यक र्त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघेल का, असे विचारता यावर ठाम मत मांडता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी नक्षलवादी असल्याचे भासवून साईबाबा यांच्या नावे बोगस वॉरंट काढले. त्यांच्या घराची झडती घेतली. यात संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आता सहा महिन्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई संशयास्पद आहे. माओवाद्याकडून होत असलेला हिंसाचार सर्मथनीय नाही. परंतु या हिंसाचाराच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

छत्तीसगडमधील हजारो आदिवासींना कारागृहात टाकण्यात आले आहे. नक्षलवादी हे आदिवासीच असल्याने नक्षलवादाचा शोध घेण्याची गरज असल्याचे रॉय यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.(प्रतिनिधी)

निवडणुकीनंतरही बदल नाही

आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. दुसरीकडे विकास दर वाढत असल्याचा दावा केला जात आहे. जोपर्यंत स्थानिकांना विकास प्रक्रि येत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत विकास शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर देशातील परिस्थितीत फारसा बदल होणार नसल्याचे मत रॉय यांनी व्यक्त केले.

Web Title: When Modi came to power, the expression on freedom of speech