नागपूर :विदर्भावर सूर्याची वक्रदृष्टी कायम आहे. उष्ण शहरांच्या ‘रेस’मध्ये अकाेला व अमरावतीला मागे टाकून वर्धा शहराने राज्यात सर्वात ‘हाॅट’ शहराचे स्थान मिळविले. वर्ध्यात शनिवारी तब्बल ४५ अंशाची नाेंद करण्यात आली. दुसरीकडे ढगाळ वातावरणात नागपूरचा पारासुद्धा उसळून ४४.२ अंशावर पाेहचला आहे.
आठ दिवसांपासून आकाशातून सूर्याच्या अग्निवर्षावाने विदर्भवासियांची अक्षरश: हाेरपळ हाेत आहे. राजस्थान, पंजाब, गुजरातचे कच्छ या भागांना मागे टाकून विदर्भातील शहरे जगातील उष्ण शहरांशी स्पर्धा करू लागले आहेत. ११ ते १५ एप्रिलपर्यंत पाच दिवस अकाेला शहर देशात सर्वात उष्ण हाेते. त्यानंतर ४४.४ अंशासह अमरावती टाॅपवर पाेहचले आणि आता वर्धा शहरातही पारा ४५ अंशावर पाेहचला आहे.
दुसरीकडे नागपूरलाही शनिवारच्या तापमानात ०.२ अंशाची वाढ झाली व ४४.२ अंशाची नाेंद झाली. यंदाच्या सिजनमधील ही सर्वाधिक नाेंद हाेय. दुपारच्या सुमारास नागपूरकरांना या रखरखत्या उन्हाचा कडाका जाणवत हाेता. दुपारी रस्त्यावरील ८० टक्के वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सायंकाळच्या सुमारास काहीशा ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी उकाड्याचा त्रास अधिक जाणवत हाेता. अमरावतीचा पारा ०.४ अंशाने घटून ४४ अंशावर खाली आला, तर अकाेला ४३.३ अंशावर खाली आला आहे. इतर सर्व शहरात कमाल तापमान ४३ च्यावर आणि ४४ अंशाच्या खाली आले.
२० पासून वादळी वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील उष्णतेची लाट आणखी दाेन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात आकाशात ढगांची गर्दी वाढू शकते. २० तारखेला वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. दाेन दिवस असेच वादळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. त्यानंतरचे काही दिवस आकाश काही प्रमाणात ढगांनी व्यापले राहिल व तापमान अंशत: कमी हाेण्याचीही शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
Web Summary : Wardha tops Vidarbha's heat chart at 45°C, surpassing Akola and Amravati. Nagpur hits 44.2°C. Heatwave persists, with possible storms from the 20th, offering slight relief.
Web Summary : वर्धा 45°C के साथ विदर्भ में सबसे ऊपर, अकोला और अमरावती को पीछे छोड़ा। नागपुर 44.2°C तक पहुंचा। लू जारी, 20 तारीख से तूफान की संभावना, जिससे थोड़ी राहत मिल सकती है।