शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा पाटील होणार नगराध्यक्ष

By admin | Updated: May 7, 2015 02:20 IST

वाडी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक १० उमेदवार निवडून आले तरी बहुमतापासून दूर असलेल्या भाजपने जुळवाजुळव करीत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला.

नागपूर : वाडी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक १० उमेदवार निवडून आले तरी बहुमतापासून दूर असलेल्या भाजपने जुळवाजुळव करीत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. भाजप- शिवसेना ‘युती’ने काँग्रेससोबत हात मिळवीत ‘अभद्र’ आघाडी तयार केली. अनूसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांना आपल्या तंबूत घेत त्यांच्याकडे नगराध्यक्षपद देण्यात येणार असून, त्या वाडीच्या पहिल्या नगराध्यक्ष बनणार आहेत. वाडी नगर परिषद झाल्यानंतर या पहिल्याच निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या युती-आघाडीतील मित्रपक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली. प्रत्येक वॉर्डातून या चारही पक्षांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीत भाजपला १० जागेवर विजय मिळविता आला. शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला ४, काँग्रेसला १, बसपला ७ आणि एका जागेवर अपक्षाला यश मिळाले. २५ सदस्यसंख्या असलेल्या या नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी भाजपला आणखी तीन नगरसेवकांची आवश्यकता होती. दरम्यान भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जवळ केले आणि अपक्ष नगरसेवकाला आपल्याकडे घेतले. बहुमतासाठी लागणारे संख्याबळ जुळविण्यात भाजपला यश आले तरी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्यासाठी एकही सदस्य त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे नगराध्यक्षपद हे विरोधी गटाकडे तर जाणार नाही ना, अशी काहीशी शक्यता निर्माण झाली. परंतु भाजपने एक पाऊल पुढे टाकत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्डातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या प्रतीक्षा पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत ‘वाडी नगर विकास आघाडी’मध्ये सहभागी करून घेतले. काँग्रेसला एकमेव जागेवर विजय मिळाला असला तरी नगर विकास आघाडीसोबत हातमिळवणी केल्याने नगराध्यक्षपद काँग्रेसच्या सदस्याला मिळणार आहे. काँग्रेसने अभद्र आघाडी केलेली असली तरी त्यांच्यासाठी हे या पदाच्या रूपाने खूप मोठे समाधान आहे, हे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)