के. व्यंकटेशम नवे पोलीस आयुक्त

By Admin | Updated: August 23, 2016 02:28 IST2016-08-23T02:28:14+5:302016-08-23T02:28:14+5:30

अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्यंकटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती

Of Venkatesham New Police Commissioner | के. व्यंकटेशम नवे पोलीस आयुक्त

के. व्यंकटेशम नवे पोलीस आयुक्त

नागपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्यंकटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदावर बदली करण्यात आली आहे.
राज्यातील सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाने सोमवारी जारी केले. त्यात व्यंकटेशम आणि यादव यांचाही समावेश आहे.
व्यंकटेशम १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ही महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. त्यांनी राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांमध्ये आमूलाग्र सुधार घडवून आणला असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त काम करता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अन्य चार अधिकाऱ्यांमध्ये रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून, एस. जगन्नाथन यांची व्यंकटेशम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर, केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची बदली ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) या पदावर तर, आतापावेतो ही जबाबदारी सांभाळणारे मकरंद रानडे यांचे ठाणे आयुक्तालयातच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेली आहे.

Web Title: Of Venkatesham New Police Commissioner