शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार कंत्राटदारांचे गडकरींना साकडे

By admin | Updated: May 7, 2017 02:18 IST

राज्य सरकारने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंत्राटदाराची आर्थिक क्षमता

नोंदणी रद्द करू नका : शासनाचा आदेश रद्द करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कंत्राटदाराची आर्थिक क्षमता व कामे करण्याचा अनुभव या आधारावर कामे दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्थानिक सुशिक्षित कंत्राटदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याची दखल घेत संबंधित शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन केली. संबंधित अन्यायकारक निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने गुरुवारी संविधान चौकात निदर्शने केली होती. त्यानंतर शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागात सुरुवातीपासून विविध स्तरावर ई-निविदा प्रणालीद्वारे नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागवून कमी दराच्या निविदाधारकास कामे दिली जात होती. ही प्रणाली सार्वजनिक बांधकाम विभाग, नोंदणीकृत कंत्राटदार या दोघांसाठी सोपी होती. या विभागाची नोंदणी ही इतर विभागात ग्राह्य मानली जात होती. मात्र, शासनाने कंत्राटदारांची नोंदणी रद्द करून त्यांना आर्थिक क्षमता आणि अनुभवाच्या आधारावर कामे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे नोंदणीकृत कंत्राटदारावर अन्याय होत आहे. विनानोंदणी कामे मिळणे सुरू झाल्यास महाराष्ट्राबाहेरील कंत्राटदारांचा लोंढा महाराष्ट्रात येईल. यामुळे स्थानिक कंत्राटदार बेरोजगार होतील. तसे झाले तर शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे संबंधित आदेश रद्द करावा, अशी मागणी असोसिएशनचे प्रताप रणनवरे, सुबोध सरोदे, संजय मैंद, अरुण ठाकरे, भूपेंद्र चरडे, रवी चव्हाण, रूपेश रणदिवे, संजीव कपूर, राजेश नबिरा, प्रदीप नगराळे, अनिल धापसे, अतुल कलोती, कौशिक देशमुख, दिलीप बाराहात आदींनी गडकरी यांच्याकडे केली. गडकरींनी साधला चंद्रकांत पाटलांशी संवाद कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर गडकरी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधला. कंत्राटदारांची भूमिका व त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. तसेच कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन यातून मार्ग काढण्याची सूचनाही गडकरी यांनी पाटील यांना केली.