शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

जुळ्या भावंडांना मिळाले सेम टू सेम मार्क्स ! खुशी-खिलाजला दहावीत मिळाले ९७.८० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:13 IST

Nagpur : जुळी मुले म्हटली की त्यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटते. मात्र, नागपुरातील एका जुळ्या बहीण-भावाने केवळ जन्मच नाही, तर गुणवत्तेतही 'जुळेपणा' सिद्ध करत दहावीच्या निकालात अनोखा विक्रम घडविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
जुळी मुले म्हटली की त्यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटते. मात्र, नागपुरातील एका जुळ्या बहीण-भावाने केवळ जन्मच नाही, तर गुणवत्तेतही 'जुळेपणा' सिद्ध करत दहावीच्या निकालात अनोखा विक्रम घडविला आहे. रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलमधील खुशी चांदेवार आणि खिलाज चांदेवार या जुळ्या बहीण-भावाने दहावीच्या परीक्षेत अगदी समान ९७.८० टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत दणक्यात स्थान मिळविले आहे.

विशेष म्हणजे, लहानपणापासून एकाच वर्गात शिकणाऱ्या या जुळ्या भावंडांमध्ये नेहमीच अभ्यासात चुरशीची स्पर्धा राहिली. कधी खुशी एक-दोन गुणांनी पुढे, तर कधी खिलाज आघाडीवर असायचा. पण, दहावीच्या निर्णायक टप्प्यावर दोघांनीही समान गुण मिळवत अक्षरशः 'गुणांचाही जुळेपणा' सिद्ध केला.

खुशी खिलाजचे आणि वडील बळीराम चांदेवार हे असून आई विशाखा चांदेवार या खासगी संस्थेत जिल्हा परिषदेत शिक्षक शिक्षिका आहेत. मुलांच्या यशाबद्दल बोलताना आई विशाखा म्हणाल्या, दोघेही स्वतंत्रपणे अभ्यास करायचे. मात्र, एखादा विषय समजला नाही तर ते एकमेकांशी चर्चा करून कन्सेप्ट क्लिअर करायचे. अभ्यासातील शंका विचारून त्याचे निरसन करून घेण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे दोघांचाही अभ्यास अधिक मजबूत झाला.

त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच त्यांच्या अभ्यासात सातत्य राहिले. शिस्तप्रिय स्वभाव, सेल्फ स्टडी आणि मेहनत हे त्यांचे सर्वात मोठे गुण आहेत. शाळेतील शिक्षकांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शालेय जीवनात नेहमीच एक-दोन गुणांची तफावत असणाऱ्या या जुळ्या भावंडांनी दहावीच्या निकालात मात्र एकाच आकड्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे त्यांच्या यशाची चर्चा शहरभर रंगली आहे.

दहावीनंतर जेईईची तयारी करून भविष्यात यूपीएससी परीक्षा देत प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न खुशी आणि खिलाज यांनी डोळ्यांत साठवले आहे. जुळ्या भावंडांच्या या अनोख्या यशाचे नागपूरकरांमध्ये कौतुक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Identical Twins Score Identical Marks: Nagpur siblings shine in exams.

Web Summary : Nagpur twins, Khushi and Khilaj Chandewar, achieved a remarkable feat by scoring identical 97.80% marks in their tenth-grade exams. The siblings, who have always been competitive, plan to pursue UPSC after JEE, aiming for careers as administrative officers.
टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालssc examदहावीnagpurनागपूरEducationशिक्षण