शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तीन ड्रायव्हिंग कंपन्यांनी १० कोटींचे व्यवहार दडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 21:42 IST

मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे.

ठळक मुद्दे १.८६ कोटींचा सेवाकर व जीएसटी बुडविला : वझलवार, देसाई, श्री ड्रायव्हिंग स्कूलडीजीजीआय नागपूर युनिटची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे.प्राप्त माहितीच्या आधारे वस्तू व सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटने मनीष वझलवार व रचना वझलवार संचालक असलेले नागपुरातील मोरेश्वर अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील वझलवार ड्रायव्हिंग स्कूल, उषा मनोहर देसाई संचालक असलेले अक्षय सोसायटी, मनीषनगर येथील देसाई ड्रायव्हिंग स्कूल आणि दिलीप ए. चित्रे संचालक असलेले गाडगे महाराज धर्मशाळा, मेडिकल चौक येथील श्री ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयावर कारवाई करून व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी केली.तिन्ही ड्रायव्हिंग स्कूल गेल्या २० वर्षांपासून लोकांना मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. हे काम करताना त्यांनी संबंधित विभागाकडून तसेच जीएसटीअंतर्गत अथवा सेवाकर विभागाकडे नोंदणी केल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले नाही. अधिकाऱ्यांनी या स्कूलच्या कार्यालयातून कच्च्या पावत्या आणि रजिस्टर जप्त केले. या कच्च्या पावत्याच्या आधारे तिन्ही स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.स्कूलने आयकर विवरण आणि अन्य वित्तीय कागदपत्रांमध्ये फार कमी व्यवहाराची नोंद दिसून आली. पण प्रशिक्षणार्थ्यांकडून रोख रक्कम घेतल्याच्या जास्तीत जास्त पावत्या आढळून आल्या. त्याकरिता स्कूलने रोखीच्या कच्च्या पावत्या प्रशिक्षणार्थींना दिल्या आहेत. त्याआधारे स्कूलच्या संचालकांनी सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :GSTजीएसटीSchoolशाळा