शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना ‘ड्रायफ्रूट्स’चा मोह, किराणा दुकानातील पावणेनऊ किलो काजू-पिस्ता-बदामवर डल्ला

By योगेश पांडे | Updated: April 22, 2025 16:28 IST

Nagpur : आरोपींनी सिगारेटची तीस पाकिटेदेखील नेली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरट्यांनी एक किराणा दुकान फोडून तेथील रोख रकमेसह पावणेनऊ किलो सुक्या मेव्याच्या पाकिटांवरदेखील डल्ला मारला. ‘फिटनेस’ व पौष्टिक आहाराबाबत जागृती वाढत असतानाच चोरट्यांनादेखील सुक्या मेव्याचा मोह आवरता आला नाही की काय असाच सवाल यातून उपस्थित होत आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आनंद अग्रवाल (३७, पांडे ले आऊट) यांचे श्यामनगर येथे आनंद सेल्स कॉर्पोरेशन नावाचे किराणामालाचे दुकान आहे. १८ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातून जवळपास २५ हजारांची रोख लंपास केली. तसेच दुकानातून इतर वस्तूंना हात न लावता केवळ सुक्या मेव्याची पाकिटेच चोरली. चोरट्यांनी तीन किलो बदाम, तीन किलो काजू, पावणे दोन किलो पिस्ता, एक किलो अक्रोडची पाकिटे उडविली. सोबतच आरोपींनी सिगारेटची तीस पाकिटेदेखील नेली. दुसऱ्या दिवशी दुकानाशेजारी असलेल्या भाजीविक्रेत्याला शटर तुटलेले दिसले. त्याने अग्रवाल यांना फोन लावून माहिती दिली. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरThiefचोर