शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' रखडले शासकीय योजनांचा लाभ कसा घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:16 IST

२०२३ नंतरचे फेरफार सातबारा 'अॅग्रिस्टॅक'शी लिंकच केले नाहीत : महसूल व कृषी विभागाने तातडीने मार्ग काढण्याची गरज

कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या 'फार्मर आयडी उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना एकाच डिजिटल ओळखीखाली आणून विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभ करणे हा आहे. मात्र, २०२३ नंतर जमीन खरेदी-विक्री, वारसा, फेरफार किंवा विभाजन झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' तयार करण्यात अडचणी येत आहेत. भूमिअभिलेख विभागाकडील २०२३ नंतरच्या सातबाराच्या नोंदी 'अॅग्रिस्टॅक' प्रणालीशी अद्याप लिंक न केल्याने शेतकऱ्यांवर हे प्रशासकीय संकट आले आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत.

राज्य व केंद्र सरकारने कृषी सेवा अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी फार्मर आयडी प्रणाली सुरू केली. या आयडीद्वारे शेतकऱ्याची जमीन, पीक, बैंक खाते, अनुदान, पीकविमा, पीएम-किसानसारख्या योजना आणि इतर कृषी माहिती एकत्रित केली जाते. परंतु, प्रत्यक्षात नवीन फेरफार झालेल्या जमिनींची माहिती सातबारावर अपडेट असली तरी ती अॅग्रिस्टॅक पोर्टलशी लिंक केली नसल्याने शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी' नोंदणी क्रमांक मिळत नाही आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आधार क्रमांक, बैंक खाते आणि सातबारा तपशील भरल्यानंतर 'लॅण्ड रेकॉर्ड नॉट फाऊंड', 'डाटा मिसमॅच' किंवा 'व्हेरिफिकेशन पेंडिंग' असे संदेश येत आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ऑनलाइन प्रक्रियेअभावी सीएससी, महा-ई-सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. संबंधित यंत्रणांकडून डेटा अपडेट झाल्यानंतरच आयडी तयार होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रक्रिया किती कालावधीत पूर्ण होईल याबाबत स्पष्टता नाही. 

महसूल व कृषिमंत्र्यांनी घ्यावी दखल

महसूलमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी राज्य पातळीवर तातडीने बैठक घेऊन ही समस्या सोडविणे आवश्यक आहे. भूमी अभिलेख विभागाकडून फेरफार प्रकरणांसाठी स्वतंत्र तांत्रिक मोहीम राबवून सर्व नोंदी अद्ययावत करणे गरजेचे आहे.

'ऑफलाइन' चाही पर्याय द्या

२०२३ पासूनच्या जमीन फेरफारच्या नोंदी लिंक करण्यासाठी बराच काळ लागू शकतो. त्यामुळे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये म्हणून ज्या शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' तयार होण्यास अडचण येत आहेत, अशांना 'ऑफलाइन' पद्धतीने या योजनांचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

खालील योजनांसाठी बंधनकारक

  • कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. महाडीबीटी कृषी योजना
  • ठिबक व तुषार सिंचन अनुदान, फळबाग लागवड योजना, ट्रॅक्टर-अवजारे अनुदान, पीक प्रात्यक्षिक योजना, नैसर्गिक आपत्ती मदत योजना, पीक विमा, पीएम-किसान लाभ आदी योजनांसाठी 'फार्मर आयडी' बंधनकारक आहे. मात्र, आयडीच तयार होत नसल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही.

'फार्मर आयडी' म्हणजे काय?

सरकारकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा अद्वितीय ओळख क्रमांक
जमीन, पीक, बैंक खाते आणि योजनांची माहिती एकत्र जोडली जाते
डिजिटल कृषी सेवा आणि ई-गव्हर्नन्ससाठी महत्त्वाचा आधार
डुप्लिकेट लाभ आणि फसवणूक टाळण्यास मदत

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhs of farmers' 'Farmer IDs' stalled, hindering access to government schemes.

Web Summary : Farmer ID creation is stalled due to land record updates not syncing. Lakhs of farmers are unable to access crucial government schemes like crop insurance and subsidies. Revenue and agriculture ministers need to address this urgently, offering offline options.
टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीfarmingशेतीMaharashtraमहाराष्ट्र