शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक नियुक्तीसाठी मुदतवाढ देणार?

By admin | Updated: July 9, 2014 00:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये किमान प्राध्यापकसंख्येसंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकांमध्ये अद्यापही ठोस निर्णय निघू शकलेला नाही.

नागपूर विद्यापीठ : समितीच्या बैठकीत अद्याप ठोस निर्णय नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांमध्ये किमान प्राध्यापकसंख्येसंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकांमध्ये अद्यापही ठोस निर्णय निघू शकलेला नाही. मंगळवारी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. ५० टक्के नियमित शिक्षकांच्या नियुक्तीला काही महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना या समितीतील सदस्यांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट लागू आहे. महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ. बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीला ७ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अद्याप या समितीचा कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. बुधवारी या समितीची आणखी एक बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)...तर १६८ महाविद्यालयांची संलग्नता काढणारदरम्यान, किमान शिक्षक नियुक्तीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.श्रीकांत कोमावार यांनी दिले आहेत. विद्यापीठात आजच्या घडीला ६६१ महाविद्यालये आहेत. यातील ७५ महाविद्यालये पूर्णवेळ बंद आहेत. या महाविद्यालयांची संलग्नता काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. शिवाय ९३ महाविद्यालयांनी केवळ एकच शिक्षक नियुक्त केला आहे. जर महाविद्यालयांनी मुदतीच्या आत अटींचे पालन केले नाही तर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम ९१ अंतर्गत या महाविद्यालयांची संलग्नतादेखील काढण्याचे अधिकार विद्यापीठाला आहेत, असे डॉ. कोमावार यांनी स्पष्ट केले. शिक्षक नियुक्तीला मुदतवाढ देणार का, या प्रश्नावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.